शहरं
Join us  
Trending Stories
1
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! 10 कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
2
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
3
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
4
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
5
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
6
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
7
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
8
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
9
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
10
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
11
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
12
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक
13
तुकोबांच्या अभंगातून उत्तर देत धनंजय पोवारनं मटण खाण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांचं केलं प्रबोधन, म्हणाला "सज्जन कसायाबरोबर मांस विकु लागला..."
14
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
15
जुलैची सुरुवात ठरणार खास, ९ राशींना भरघोस लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, शुभ-कल्याणकारक काळ!
16
टीम इंडियाच्या ' या ' स्टार क्रिकेटरसोबत केलेला 'वन नाईट स्टँड'; बॉबी डार्लिंगचा खुलासा
17
शेअर बाजारात घसरण, सबस्क्रायबर्सही होताहेत कमी; तरीही वाढतोय Vodafone Idea चा शेअर, कारण काय? 
18
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात
19
नेटफ्लिक्सचा 'स्क्विड गेम 3' सुपरहिट की फ्लॉप? प्रेक्षकांच्या नाराजीमुळे शेअर बाजारात हाहाकार!
20
July Born Astro: कसा ओळखावा जुलैमधल्या लोकांचा स्वभाव? ब्रह्मदेवालाही कळणे कठीण; वाचा गुण-दोष!

अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान

By admin | Updated: December 15, 2014 00:49 IST

वाळूज महानगर : वाळूज महानगरासह परिसरात आज पहाटे झालेल्या अवकाळी पावसामुळे गहू, ऊस, तूर, कापूस आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे

वाळूज महानगर : वाळूज महानगरासह परिसरात आज पहाटे झालेल्या अवकाळी पावसामुळे गहू, ऊस, तूर, कापूस आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेल्या पिकांचे नुकसान झाल्यामुळे शेतकरीदादा हवालदिल झाला आहे. वरुणराजाने पाठ फिरविल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळले. दुबार पेरणी करूनही वरुणराजा बरसला नसल्याने कर्जबाजारी झालेला शेतकरी अधिकच हवालदिल झाला. अपुरा पाऊस होऊनही शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने पिके जगवली. कापूस, ऊसतोडणीला आला आहे, तर तूर काढणीला. ऊस, कापूस, तूर, गहू आदी पिके शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आली आहेत; परंतु आज पहाटे वाळूज महानगरासह परिसरातील पाटोदा, वळदगाव, जोगेश्वरी, रांजणगाव शेणपुंजी, वडगाव कोल्हाटी, पंढरपूर, वाळूज, लांझी, तीसगाव, रामराई, टेंभापुरी आदी भागांत जोरदार अवकाळी पाऊस झाला. या अवकाळी पावसामुळे ऊस, गहू, तूर खाली पडली आहे. कापसाची बोंडे गळून गेली असून कापसाच्या वाती झाल्या आहेत. ऊस, कापूस, गहू, तूर आदी पिक ांचे, तसेच कांदा, वांगे व पालेभाज्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. हातातोंडाशी आलेली पिके हातची जात असल्याने शेतकरीराजा हवालदिल झाला आहे. नैसर्गिक संकटामुळे शेतकरीराजा आर्थिकदृष्ट्या अधिक चिंतेत सापडला आहे.