शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

निकष डावलून

By admin | Updated: August 13, 2016 00:12 IST

उस्मानाबाद : परंडा तालुक्यातील खासगाव ग्रामपंचायतीसाठी तेराव्या वित्त आयोगातून सन २०१४-१५ मध्ये सुमारे दहा लाखांवर निधी मंजूर झाला होता.

उस्मानाबाद : परंडा तालुक्यातील खासगाव ग्रामपंचायतीसाठी तेराव्या वित्त आयोगातून सन २०१४-१५ मध्ये सुमारे दहा लाखांवर निधी मंजूर झाला होता. या निधीतून गावामध्ये विकास कामे राबविणे बंधनकारक होते. परंतु, तत्कलीन सरपंच, ग्रामसेवकांनी या निकषाकडे कानाडोळा करीत गाव अथवा वाडी-वस्तीला न जोडणाऱ्या रस्त्यावर सुमारे १० लाख ३० हजार रूपये खर्च केले. यासंबंधी तक्रारी झाल्यानंतर आलेल्या चौकशीतून हा नियमबाह्य कारभार उजेडात आला आहे. याची गंभीर दखल घेत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते यांनी तत्कालीन सरपंच, ग्रामसेवक यांच्याकडून प्रत्येकी पन्नास टक्के रक्कम वसूल करण्याचे आदेश दिले आहेत. परंडा तालुक्यातील खासगाव ग्रामपंचायतीअंतर्गत विकास कामे करण्यासाठी तेराव्या वित्त आयोगातून सुमारे १० लाख ३० हजार ३५२ रूपये एवढ निधी मंजूर झाला होता. ही रक्कम संतुलित ग्राम समृद्ध योजनेसंबंधी खर्च करणे अपेक्षित होते. सदरील कामे गावाबाहेर नव्हे, तर गावात राबविणे बंधनकारक होते. परंतु, ग्रामपंचायतीकडून याच निकषाकडे कानाडोळा करण्यात आला. शासनाने घालून दिलेले नियम, दंडक धाब्यावर बसून गावापासून अंदाजे एक ते दीड किमी अंतरावर खासगाव ते बेडगा या शिवरस्त्याचे काम करण्यात आले. हा रस्ता कोणतेही गाव अथवा वाडीला जोडणारा नाही. दरम्यान, सदरील प्रकार समोर आल्यानंतर गावातीलच कालिदास नामदेव जगदाळे यांनी प्रशासनाकडे धाव घेत रस्ता कामाची चौकशी करण्याची मागणी केली. त्यानुसार जिल्हा परिषदेकडून पंचायत समिती गटविकास अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले होते. चौकशीअंती सुमारे १० लाख ३० हजार ३५२ रूपये शासनाच्या निकषानुसार खर्च केले नसल्याचा ठपका तत्कालीन प्रभारी सरपंच बबनराव लिमकर, ग्रामसेविका एस. के. आगरकर यांच्यावर ठेवण्यात आला होता. उपरोक्त रक्कम सरंपच, ग्रामसेवकाकडून प्रत्येकी ५० टक्के या प्रमाणात वसूल करण्यात यावी, अशी शिफारसही अहवालामध्ये केली होती. तसेच तत्कालीन शाखा अभियंता बी. बी. डांगे यांच्याविरूद्ध शिस्तभंग विषयक कारवाई प्रस्तावित करणेबाबत अहवालाद्वारे कळविले होते. दरम्यान, सदरील प्रकरण मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात गेल्यानंतर त्यांनी या प्रकरणी सुनावणी घेतली. सुनावणीनंतर पुन्हा चौकशीचे आदेश दिले. शाखा अभियंता एम. डी. म्हेत्रे व विस्तार अधिकारी पी. एस. गलांडे यांनी चौकशी करून अहवाल सादर केला. या अहवालामध्येही सदरील काम नियमबाह्यरित्या म्हणजेच निकष डावलून केल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. सदरील प्रक्रिया होवून काही महिन्यांचा कालावधी लोटला आहे. परंतु, अद्याप १० लाख ३० हजार रूपये वसूल झालेले नाहीत. (प्रतिनिधी) पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी केलेल्या चौकशी अहवालामध्ये तत्कालीन प्रभारी सरपंच बबनराव लिमकर यांच्यावर ठपका ठेवण्यात आला होता. तर शाखा अभियंता म्हेत्रे व विस्तार अधिकारी गलांडे यांनी केलेल्या चौकशी अहवालामध्ये तत्कालीन सरपंच भारत दशरथ थाटे यांचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकारास दोघापैैकी नेमके जबाबदार कोण? असा प्रश्न आता उपस्थित होवू लागला आहे. निकष डावलून रस्त्याचे काम केल्यामुळे सदरील रक्कम तत्कालीन सरपंच, ग्रामसेवकाकडून वसूल करण्याचे आदेश आहेत. परंतु, ज्यांनी हा गोंधळ घातला, त्यांचे दुसऱ्यांदा झालेल्या चौकशी अहवालात नाव नाही, असा आरोप करीत या प्रकरणी फेर सुनावणी घेण्याची मागणी कालिदास जगदाळे यांनी केली आहे.