शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
4
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
5
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
6
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
7
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
8
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
9
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
10
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
11
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
12
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
13
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
14
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
15
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
16
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
17
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
18
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
19
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
20
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

महिला शिपायावर गुन्हा

By admin | Updated: November 19, 2015 00:26 IST

अंबाजोगाई : जिल्हाधिकारी यांच्या बनावट स्वाक्षरीचा शिपाई पदाचा आदेश तहसील कार्यालयात सादर करून एक महिला शासकीय सेवेत रुजू झाली.

 

अंबाजोगाई : जिल्हाधिकारी यांच्या बनावट स्वाक्षरीचा शिपाई पदाचा आदेश तहसील कार्यालयात सादर करून एक महिला शासकीय सेवेत रुजू झाली. ही बाब अधिकाऱ्यांच्या निदर्शनास येताच तिच्याविरूध्द शहर ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, ती महिला फरार झाली आहे.कांचन दिलीप गाडे असे त्या बनावट महिला शिपायाचे नाव आहे. आष्टी तालुक्यातील जळगाव येथील कांचन गाडे ही महिला ४ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या बनावट स्वाक्षरीचा शिपाई पदाचा रूजू होण्याचा आदेश घेऊन अंबाजोगाई येथील तहसील कार्यालयात दाखल झाली. तो अर्ज सादर करून कांचन सेवेत रूजू झाली. कांचन हिने रुजू होण्यासाठी आणलेला आदेश, त्यातील संदर्भ व इतर बाबी संशयास्पद वाटल्याने नायब तहसीलदार बाळकृष्ण वांजरखेडकर यांनी हा प्रकार जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या निदर्शनास आणून दिला. त्यानंतर कांचन गाडे हिने दाखल केलेल्या सर्व कागदपत्रांची शहानिशा करण्यात आली. त्यानंतर आदेश व कागदपत्रे बनावट असल्याचे समोर आले. या प्रकरणामुळे कांचनची चौकशी केली असता, हा सर्व बनावट प्रकार महसूल प्रशासनाच्या निदर्शनास आला.हा प्रकार अंगलट येणार असल्याचे समजताच सदरील महिला फरार झाली आहे. या प्रकरणी नायब तहसीलदार बाळकृष्ण वांजरखेडकर यांनी बुधवारी अंबाजोगाई शहर ठाण्यात कांचन गाडेविरूध्द फिर्याद दाखल केली.बनावट दस्तऐवज, खोट्या स्वाक्षऱ्या करून प्रशासनाची फसवणूक केल्याप्रकरणी तिच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कांचन गाडे हिने जिल्हाधिकारी यांचा बनावट आदेश आणून रूजू झाली. मात्र, रुजू होताना तिने बनावट कागदपत्रे दिली होती.कांचन हिने ही बनावट कागदपत्रे आणली कोठून ? हा प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला आहे. यासह जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची आदेशावर सही कोणी केली ? हाही तपासाचा भाग आहे.या प्रकरणामुळे एकूणच नवीन भरती झालेल्या कर्मचाऱ्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रॅकेट सक्रीय असल्याचा संशयमहसूल प्रशासनामध्ये तहसीलदार, नायब तहसीलदार यांच्या सहीचे शिक्के तसेच त्यांच्या हुबेहूब सह्या मारणारे दलाल असल्याचे यापूर्वी समोर आले आहे.मात्र, कांचन गाडे हिने जो आदेश आणलेला आहे त्यावर जिल्हाधिकाऱ्यांची बनावट सही असल्याने इतर कोणते रॅकेट सक्रीय झाले आहे काय ? याचा तपास करणे आवश्यक आहे. गाडेची तपासणी केल्यानंतर सर्व बाबी समोर येतील.(वार्ताहर)