उस्मानाबाद : ‘घरातील भुताटकी बाहेर काढतो’ असे म्हणत एक दोन नव्हे तब्बल चार लाख, ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कोल्हेगाव, आळणी व उमरगा येथील तीन भोंदू महाराजांविरुद्ध उस्मानाबाद ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. यातील एका भोंदूगिरी करणाऱ्या महाराजांना अटक करण्यात आली असून, दोघे फरार आहेत़तालुक्यातील अळणी येथील एक इसम व त्याच्या मेहुण्यास आळणी येथीलच एक भोंदू महाराजासह कोल्हेगाव व उमरगा येथील एका महाराजाने ‘तुमच्या घरात भूत प्रेताची बाधा आहे़ तुमचे दिवस चांगले नाहीत़ भुताटकी काढावी लागेल’ असे म्हणत तब्बल साडेचार लाख रुपये घेतले़ त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर आळणी येथील इसमाने उस्मानाबाद ग्रामीण पोलिस ठाण्यात धाव घेवून फिर्याद दिली़ या फिर्यादीवरून तिन्ही भोंदू महाराजांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)भोंदू महाराजाविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर एका महाराजाला लातूर येथून उचलून आणण्यात आले होते़ पोलिस ठाण्यात येताच त्या महाराजाची प्रकृती बिघडली अन् त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले़ पोलिसांच्या बंदोबस्तात महाराजांवर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत़
तीन भोंदू महाराजांविरुद्ध गुन्हा
By admin | Updated: December 22, 2014 00:59 IST