शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

क्रिकेटर तरुणाला झालेली मारहाण सीसीटीव्ही कॅमेºयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2017 00:20 IST

किरकोळ कारणावरून मित्रासोबत झालेल्या भांडणानंतर एका क्रिकेटर तरुणाला चार ते पाच गुंडांनी बेदम मारहाण केली. ११ आॅगस्ट रोजी जय टॉवर येथील एका ड्रायव्हिंग स्कूलच्या कार्यालयात ही घटना घडली

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : किरकोळ कारणावरून मित्रासोबत झालेल्या भांडणानंतर एका क्रिकेटर तरुणाला चार ते पाच गुंडांनी बेदम मारहाण केली. ११ आॅगस्ट रोजी जय टॉवर येथील एका ड्रायव्हिंग स्कूलच्या कार्यालयात ही घटना घडली. या घटनेत तरुणाच्या कानाचा पडदा फाटला असून, चार दिवसांपासून तो घाटी रुग्णालयात उपचार घेत आहे. ही मारहाण तेथील सीसीटीव्ही कॅमेºयात कैद झाली.सौरव जाधव असे जखमी तरुणाचे नाव आहे. याविषयी अधिक माहिती देताना त्याच्या वडिलांनी सांगितले की, सौरव हा देवगिरी कॉलेजमध्ये बी.सी.एस.चे शिक्षण घेतो. तो चांगला क्रिकेटर असून, त्याला चार दिवसांनंतर श्रीलंकेत क्रिकेट खेळण्यासाठी जायचे आहे. काही दिवसांपूर्वी त्याचा कॉलेजमधील काही तरुणांसोबत किरकोळ कारणावरून वाद झाला होता. नंतर हा वाद आपसात मिटलाही. दरम्यान ११ आॅगस्ट रोजी तो त्याच्या मित्रासह जय टॉवर येथील ड्रायव्हिंग स्कूलमध्ये बसलेला होता. यावेळी चार ते पाच बॉडी बिल्डर गुंड तेथे आले आणि त्यांनी सौरवला मारहाण केली. यावेळी त्यास सोडविण्याचा प्रयत्न करणाºया त्याच्या मित्रालाही त्यांनी मारले. या घटनेत सौरवच्या कानाचा पडदा फाटला. विशेष म्हणजे शहरात गुंडाराज स्टाइल झालेली मारहाण तेथील सीसीटीव्ही कॅमेºयात कैद झाली. याविषयी आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवून न्याय द्यावा, यासाठी सौरवचे आई-वडील चार दिवसांपासून वेदांतनगर पोलीस ठाण्यात चकरा मारीत आहेत; मात्र पोलीस अधिकारी त्यांची तक्रार नोंदवून घेत नसल्याचा आरोप त्यांनी केला. दरम्यान, त्यांनी याविषयी पोलीस आयुक्तांकडे तक्रार करण्यासाठी सोमवारी आयुक्तालयात धाव घेतली होती.याविषयी सौरवच्या वडिलांनी सदर प्रतिनिधीला सांगितले की, ही घटना घडल्यानंतर आम्ही तक्रार देण्यासाठी वेदांतनगर पोलीस ठाण्यात गेलो, तेव्हा दुसºया दिवशी येण्याचे पोलीस निरीक्षक डी.एस. सिनगारे यांनी सांगितले. दुसºया दिवशी गेल्यानंतर त्यांनी तुमच्या मुलाविरुद्धही गुन्हा दाखल होईल, कशाला तक्रार करता, असे सांगितले. आमच्याच मुलाला चार ते पाच जणांनी बेदम मारहाण केल्याचे सीसीटीव्हीत स्पष्टपणे दिसत आहे. या सीसीटीव्ही कॅमेºयात सौरवने कोणावरही हात उचलला नाही, असे असताना पोलिसांनी आमची तक्रार नोंदवून घेण्याऐवजी आरोपींची बाजू घेतल्याने आश्चर्य वाटते.