शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
4
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
5
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
6
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
7
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
8
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
9
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
10
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
11
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
12
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
13
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
14
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
15
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
16
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
17
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
18
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
19
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
20
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

गोवंश हत्या; तिघांना रंगेहाथ पकडले

By admin | Updated: November 19, 2015 00:25 IST

अंबाजोगाई : तालुक्यातील लोखंडी सावरगाव येथील एका घरात गोवंशाची हत्या करण्यात येत असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांना मिळाली.

अंबाजोगाई : तालुक्यातील लोखंडी सावरगाव येथील एका घरात गोवंशाची हत्या करण्यात येत असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांना मिळाली. त्यावरून केलेल्या कारवाईत १५० किलो मांसासह तिघांना रंगेहाथ पकडून गजाआड करण्यात आले.लोखंडी सावरगाव येथील अफजल अलीशेर कुरेशी यांच्या बसस्थानकामागील घरात गोवंश हत्या करण्यात येत असल्याची गुप्त माहिती ग्रामीण ठाण्याचे निरीक्षक चंद्रशेखर चौधरी यांना मिळाली. त्यांनी सहकाऱ्यांसह घरावर अचानक छापा मारला असता पांढऱ्या रंगाच्या खिल्लारी बैलाची हत्या करण्यात आल्याचे दिसून आले.यावेळी घटनास्थळी सदरील बैलाचे १५० किलो मांस, बैलाची हत्या करण्यासाठी वापरलेली कुऱ्हाड व इतर अवजारांसह अजबल अलीशेर कुरेश (वय २६), काशीम अलिशेर कुरेशी (वय ३४) व दस्तगीर अलीशेर कुरेशी (वय २८) या तिघांना घटनास्थळावरून पोलिसांनी ताब्यात घेतले.गोवंशांचे मांस जप्त करण्यात आल्यानंतर शासकीय पशुचिकित्सा अधिकारी यांच्याकडून या मांसाची तपासणी करून रीतसर अहवाल प्राप्त झाला. त्यानंतर वरील तिघांविरोधात कलम ५ ब, क, ९ अ महाराष्ट्र प्राणी परीक्षण (सुधारणा) कायदा १९९५ व कलम ११ प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायदा १९६० व ३४ भादंवि या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास निरीक्षक चंद्रशेखर चौधरी करीत आहेत. (वार्ताहर)