शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

देशातील पहिल्या कर्करोग रुग्णालयाचा मान औरंगाबादला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2017 00:48 IST

औरंगाबाद : औरंगाबादेतील कर्करोग रुग्णालय म्हणजेच राज्य कर्करोग संस्था आगामी दोन वर्षांत अत्याधुनिक उपचार आणि पायाभूत सुविधांनी सुसज्ज होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : औरंगाबादेतील कर्करोग रुग्णालय म्हणजेच राज्य कर्करोग संस्था आगामी दोन वर्षांत अत्याधुनिक उपचार आणि पायाभूत सुविधांनी सुसज्ज होणार आहे. केंद्र सरकारच्या निधीमुळे अत्याधुनिक प्रयोगशाळा, रक्तपेढी उभारण्यासह येथील डॉक्टर, तंत्रज्ञ, निवासी डॉक्टर आणि आवश्यक मनुष्यबळाचा प्रश्न सुटणार आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास संलग्न आणि वैद्यकीय महाविद्यालयाने चालविलेल्या देशातील पहिल्या कर्करोग रुग्णालयाचा मानही औरंगाबादच्या कर्करोग रुग्णालयास मिळाला आहे, असे टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे संचालक (अकॅडमिक) डॉ. कैलास शर्मा म्हणाले.मराठवाड्यातील गरीब रुग्णांसाठी आशेचा किरण ठरलेल्या कर्करोग रुग्णालयास राज्य कर्करोग संस्थेचा दर्जा मिळाला आहे. या अंतर्गत केंद्र सरकारचा ४५ कोटी रुपये अनुदानाचा पहिला हप्ता मिळाला आहे. या निधीचे योग्य नियोजन व्हावे, यासाठी डॉ. कैलास शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी (दि.१०) कर्करोग रुग्णालयात बैठक होणार आहे. या बैठकीनिमित्त औरंगाबादेत दाखल झाल्यानंतर रविवारी (दि.९) त्यांनी लोकमत कार्यालयास सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी ‘लोकमत’चे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी त्यांचे स्वागत केले. डॉ. कैलास शर्मा यांनी कर्करोग रुग्णालयाच्या आतापर्यंतच्या वाटचालीबद्दल आणि पुढील दोन वर्षांत रुग्णालयाच्या विकासासंदर्भात संपादकीय विभागाशी यावेळी संवाद साधला.शहरातील विभागीय शासकीय कर्करोग रुग्णालय २१ सप्टेंबर २०१२ रोजी रुग्णसेवेत दाखल झाले. गेल्या पाच वर्षांत हजारो रुग्णांना येथील उपचारामुळे नवीन आयुष्य मिळाले. हे रुग्णालय सुरू होण्यासाठी अनेकांचे योगदान आहे. डॉ. शर्मा म्हणाले, क र्करोग रुग्णालय सर्जिकल, मेडिकल आॅन्कोलॉजी आणि रेडिओथेरपी या तीन मुख्य विभागांवर चालते. या तीन विभागांना पाठिंबा देणारे अ‍ॅनेस्थेशिया, पॅथॉलॉजी, रेडिओलॉजी, रक्तपेढी, मायक्रोबायोलॉजी, न्यूक्लिअर मेडिसिन असे आठ ते नऊ विभाग लागतात, तरच कर्क रोग रुग्णालय चालू शकते. वैद्यकीय महाविद्यालयाला जोडून कर्करोग रुग्णालय उभारले तर केवळ तीन मुख्य विभाग लागतात. उर्वरित आठ ते नऊ विभाग हे वैद्यकीय महाविद्यालयात असतात. त्यामुळे १०० खाटांचे कर्करोग रुग्णालय सहज उभे होते, ही माझी संकल्पना आहे. त्यामुळे वैद्यकीय महाविद्यालयात कर्करोग रुग्णालय बनवावे, असे मी शासनाला सांगितले आहे. याच संकल्पनेवर औरंगाबादेत इतके चांगले कर्करोग रुग्णालय उभारले गेले, असेही ते म्हणाले.निधीचे योग्य नियोजनइतर राज्यांमध्ये केवळ जमीन दाखवून राज्य कर्करोग संस्थेसाठी निधी मंजूर करून घेण्यात आला. आपल्याकडे राज्य सरकारने आधीच कर्करोग रुग्णालयासाठी गुंतवणूक केलेली आहे. त्यामुळे राज्य कर्करोग संस्थेची घोषणा होण्यासाठी पाठपुरावा केला. अखेर ही घोषणा झाली आणि काही दिवसांपूर्वीच कर्करोग रुग्णालयास केंद्र सरकारच्या वाट्यातील अनुदानाचा पहिला हप्ता प्राप्त झाला. या निधीचे नियोजन कसे करायचे, यासाठीच मी औरंगाबादेत आलो. निधीचा गैरवापर होऊ नये यासाठी आवश्यक कामांचा, यंत्रसामग्रींचा अधिष्ठातांच्या पातळीवर केवळ प्रस्ताव तयार होईल. त्यासंदर्भात शासनच निर्णय घेईल. कमीत कमी निधीत उच्च दर्जाची यंत्रसामग्री घेण्यासाठी टाटा हॉस्पिटलही लक्ष देईल, असेही ते म्हणाले.अत्याधुनिक प्रयोगशाळाकर्करोग रुग्णालयात अत्याधुनिक प्रयोगशाळा आवश्यक आहे. अशी प्रयोगशाळा कर्करोग रुग्णालयात सध्या नाही. बाहेरून तपासण्या कराव्या लागतात. त्यामुळे येथे अत्याधुनिक प्रयोगशाळा कार्यान्वित करणार आहोत. बाहेरून आठ हजार रुपयांमध्ये होणारी चाचणी या ठिकाणी होईल. जीवनदायी योजनेत त्याचा समावेश करण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असे डॉ. शर्मा म्हणाले.संचालकपदाची निर्मिती अधिष्ठाता सर्वत्र लक्ष ठेवू शकत नाही, त्यामुळे कर्करोग रुग्णालयासाठी प्राध्यापकस्तरावरील व्यक्तीस प्रमुख करावे, त्यासाठी संचालक, वैद्यकीय अधीक्षक पदांची निर्मिती करण्यासंदर्भात ठरवावे, असा प्रस्ताव द्यावा, असे सोमवारी (दि.१०) होणाऱ्या बैठकीत सांगणार असल्याचे डॉ. शर्मा म्हणाले.सेवेची भावनामाझे वैद्यकीय शिक्षण (एमडी) औरंगाबादेतच झालेले आहे, त्यामुळे या ठिकाणी सेवा देण्याचे माझेही कर्तव्य आहे. याच भावनेतून सर्जिकल आॅॅन्कोलॉजी आणि मेडिकल आॅन्कोलॉजी यांना चार-चार महिन्यांसाठी कर्करोग रुग्णालयात नियुक्ती दिली आहे. काम येथे करीत असले तरी वेतन आम्ही देत आहोत. आज ते खूप चांगले काम करीत असून, शस्त्रक्रियांचे प्रमाणही वाढले आहे.