शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
4
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
5
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
6
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
7
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
8
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
9
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
10
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
11
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
12
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
13
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
14
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
15
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
16
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
17
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
18
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
19
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
20
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
Daily Top 2Weekly Top 5

देशपातळीवरील दंत ‘डेंटल’च्या मूळ जागा कायम राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2016 00:43 IST

औरंगाबाद : वाढीव दहा जागांवरील प्रवेशास मान्यता न देण्याच्या शिफारशींचा शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाच्या मूळ जागांवरील

औरंगाबाद : वाढीव दहा जागांवरील प्रवेशास मान्यता न देण्याच्या शिफारशींचा शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाच्या मूळ जागांवरील प्रवेशावर कसलाही परिणाम होणार नाही, असे अधिष्ठाता डॉ. एस. पी. डांगे यांनी कळविले आहे.दंत परिषदेच्या पथकाने २५ एप्रिल रोजी वाढीव प्रवेश क्षमतेच्या मान्यतेसाठी तपासणी केली होती. त्यानंतर १० मे रोजी पत्र पाठवून त्रुटी कळविल्या होत्या. महाविद्यालयाने त्रुटींबाबतचा अहवाल १८ मे रोजी सादर केला. त्यानंतर पथकाने ७ जून रोजी पुन्हा तपासणी केली. याबाबतची सुनावणी नवी दिल्ली येथे येत्या २७ जून रोजी ठेवण्यात आली आहे. शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयातील १० वाढीव जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ नये, अशी शिफारस भारतीय दंत परिषदेने केंद्रीय आरोग्य मंत्रालयास केली असली, तरी मूळ जागांवरील प्रवेशांवर त्याचा कसलाही परिणाम होणार नाही, असे डॉ. डांगे यांनी सांगितले.महाविद्यालयांच्या नुकत्याच करण्यात आलेल्या सर्वेक्षणात औरंगाबादेतील शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाने १३ वे स्थान पटकावले. परंतु पहिल्या १५ सर्वोत्कृष्ट महाविद्यालयांमध्ये समावेश असूनही याच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या जागा पायाभूत सुविधांच्या त्रुटींमुळे कमी करण्याची शिफारस करण्यात आली. अशा परिस्थितीत त्रुटींची पूर्तता करण्याचे आव्हान महाविद्यालयासमोर उभे राहिले आहे. देशभरातील सर्वोत्कृष्ट महाविद्यालयांची यादी एका संस्थेतर्फे जाहीर करण्यात आली. यासंदर्भात २०१५-१६ मध्ये सर्वेक्षण करण्यात आले. सर्वेक्षणात शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाने १३ वे स्थान प्राप्त केले. अवघ्या काही दिवसांपूर्वीची ही परिस्थिती असताना सुविधांच्या त्रुटींमुळे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची संख्या कमी करण्याची शिफारस करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या दहा जागा घटविण्याचे आदेश आरोग्य मंत्रालयाने दिले आहेत. त्यामुळे त्रुटींची तातडीने पूर्तता न झाल्यास ‘बीडीएस’च्या ५० वरून ४० वर जागा येण्याची शक्यता आहे. भारतीय दंत परिषदेच्या निरीक्षकांनी केलेल्या तपासणीत विविध त्रुटी आढळल्या. त्यामुळे महाविद्यालयाच्या ‘बीडीएस’च्या १० जागा कमी करण्याचा प्रस्ताव परिषदेने आरोग्य मंत्रालयास दिला. परिणामी ५० ऐवजी ४० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची नामुष्की ओढवली आहे. त्रुटींची पूर्तता केली जाणार असल्याने जागा कमी होणार नसल्याचे महाविद्यालयाचे म्हणणे आहे. ९९ टक्के त्रुटींची पूर्तता करण्यात आली आहे. राहिलेल्या त्रुटी महिनाभरात पूर्ण होतील. त्यामुळे जागा कमी होणार नाहीत. उलट जागा ५० वरून १०० करण्याचा प्रयत्न आहे, असे शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. पी. डांगे यांनी सांगितले.