शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

बनावट तक्रार; पोलिसांकडून मुकादमाची ‘पोलखोल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 00:01 IST

साखर कारखान्याकडून घेतलेली उचल बुडवण्याच्या हेतूने चोरट्यांनी रस्त्यात अडऊन लुटल्याची खोटी तक्रार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कपाटोदा : साखर कारखान्याकडून घेतलेली उचल बुडवण्याच्या हेतूने चोरट्यांनी रस्त्यात अडऊन लुटल्याची खोटी तक्रार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. पोलिसांनी सखोल चौकशी करून बनाव उघडकीस आणला. त्यामुळे तक्रारदारालाच जेलमध्ये जावे लागले. अंमळनेर पोलिसांनी गुरूवारी ऊसतोड मुकदमाची ‘पोलखोल’ केली .म्हातारदेव अश्रुबा खेडकर (६५ रा.चिंचपूर इजदे, जि.अहमदनगर) असे बनाव करणाºया मुकदमाचे नाव आहे. तो बैल व्यापारीही आहे. खेडकर याने बुधवारी अंमळनेर पोलिसात तक्रार दिली. तक्रारीनुसार तो ८ आॅगस्ट रोजी बैल खरेदीसाठी राशीन येथे मोटरसायकल वरु न गेला होता. सोबत दोन लाख रूपये होते. व्यवहार न झाल्याने तो कडा-आष्टी मार्गे चिंचोली गडाकडे निघाला होता, मूगगावजवळ रस्त्यात त्यास चार लोकांनी अडवले. मारहाण करून त्याच्याकडील दोन लाख रूपये आणी मोटारसायकल पळविली. घाबरलेल्या अवस्थेत चिंचपूर गाठले. ९ आॅगस्ट रोजी अंमळनेर पोलीस ठाण्यात त्याने अशा आशयाची तक्रार नोंदवली. दिवसा मारहाण करून दोन लाखाची रक्कम मोटरसायकल सह लुटल्याचे प्रकरण गंभीर असल्याने पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांनी उपअधिक्षक डॉ.अभिजीत पाटील यांच्यासह अंमळनेर पोलिसांना तात्काळ तपास लावण्याचे आदेश दिले.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अंमळनेरच्या सहायक पोलीस निरीक्षक विशाखा धुळे, पोलीस उपनिरीक्षक ए.बी.गटकुळ यांनी खेडकर याची ८ आॅगस्टची सर्व माहिती मिळवली. तो घटनेदिवशी राहूरी (जि.अ.नगर)असल्याचे समोर आले. खेडकर यास खाक्या दाखवताच तो पोपटासारखा खरे बोलू लागला. पंढरपूरच्या विठ्ठल साखर कारखान्याकडून घेतलेल्या उचलीचा तगादा चुकवण्यासाठी खोटी तक्रार केल्याचे त्याने कबुल केले.जामदार बाप्पासाहेब अर्सुळ यांच्या तक्रारीवरु न खेडकरविरूद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या खोट्या तक्रारीच पाटोदा तालुक्यात चांगलीच चर्चा सुरू आहे.