शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

किडीत गुरफटला कापूस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 00:14 IST

पावसाची हजेरी कमी अन् ढगाळ वातावरण जास्त, अशा स्थितीत पांढरे सोने (कापूस) पीक अडचणीत सापडले़ रस शोषण करणाºया किडीत कापूस गुरफटल्याने शेतकºयांची मोठी धावपळ उडाली आहे़ किडीचा प्रतिबंध करण्यासाठी फवारणीने शिवारात एकच धांदल उडाली आहे, असे चित्र तालुक्यात दिसत आहे़

लोकमत न्यूज नेटवर्ककंधार : पावसाची हजेरी कमी अन् ढगाळ वातावरण जास्त, अशा स्थितीत पांढरे सोने (कापूस) पीक अडचणीत सापडले़ रस शोषण करणाºया किडीत कापूस गुरफटल्याने शेतकºयांची मोठी धावपळ उडाली आहे़ किडीचा प्रतिबंध करण्यासाठी फवारणीने शिवारात एकच धांदल उडाली आहे, असे चित्र तालुक्यात दिसत आहे़गत १५ दिवसांपासून ढगाळ वातावरण असून ते पांढºया सोन्याच्या मुळावर आले़, असेच म्हणावे लागेल. रस शोषण करणाºया किडीचा (मावा, तुडतुडे, फूलकिडे, पांढरी माशी) मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला़ आणि कापूस पानातून रस शोषून घेण्यास किडीने वेग घेतला़ पाने लालसर होत राहिली़ पाने अन्नद्रव्ये घेण्याच्या प्रक्रिया मंदावली़ किडीने पिकाची वाढ खुंटते, कापूस बोंड भरण्याची प्रक्रिया मंदावून उत्पादन घटणार या चिंतेने शेतकरी अधिक चिंतीत झाला़कंधार महसूल मंडळातील २५ महसुली गावांत २ हजार ८१० हेक्टर लागवड केलेले कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत आले़ कुरुळा मंडळातील २२ गावांत २ हजार ३४० हेक्टर, फुलवळ मंडळातील २१ गावांतील २ हजार ८४७ हेक्टर, उस्माननगर मंडळातील १७ गावांत ३ हजार ३३८ हेक्टर, पेठवडज मंडळातील १८ गावांत ३ हजार ६० हेक्टर आणि सर्वाधिक बारूळ मंडळातील २० गावांतील ४ हजार ३८ हेक्टर लागवड केलेल्या शेतकºयांची मोठी गाळण उडाली़ एकीकडे पाऊस साथ देत नाही, आॅनलाईन सेवा वेळेत मिळत नसल्याने कर्जमाफीसाठीचे अर्ज दाखल करताना अडचणीचा सामना करावा लागतो़ त्यात कापसावर कीड प्रतिबंधासाठीची फवारणी करताना शेतकºयांची दमछाक उडत आहे़ पावसाअभावी पीक अपेक्षित आले नाही़ त्यात पुन्हा किडीचा शिरकाव झाल्याने शेतकरी संकटमालिकेवर मात करण्याचा आटोकाट प्रयत्न करतानाचे चित्र आहे़पिकावरील कीड नियंत्रणासाठी कृषी विभाग मोहीम राबवित आहे़ गावातील कृषी वार्ता फलकावर फवारणीची माहिती देण्यासाठी सक्रिय झाला आहे़ सदर माहिती आधारावर शेतकरी शिवारात फवारणी करतानाचे चित्र आहे़