सोयगाव तालुका हा कपाशी पिकात नेहमी अग्रेसर राहतो. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच शेतकरी कपाशीची धूळ पेरणी करतात. मात्र यंदा शासनाने बियाणे विक्री उशिरा सुरु केल्यामुळे धूळ पेरण्या उशिरा सुरु झाल्या. बियाणे विक्री सुरु झाल्यापासून आठवडाभरातच तालुक्यात सुमारे दहा हजार हेक्टरवर कपाशी पिकांच्या धूळ पेरण्या पूर्ण झाल्या. तर काही भागात लागवडीची लगबग दिसत आहे. काही भागात उगवून आलेल्या कोवळ्या अंकुरांची देखभाल करण्यासाठी कोळपणीची कामे सुरु करण्यात आली आहे. सध्या शेतशिवार गजबजून गेलेे असून कपाशी लागवडीकरिता मजुरांचे जथ्थेच्या जथ्थे शेतावर जाताना दिसत आहेत.
चौकट
मजुरीत वाढ
मागील वर्षीपेक्षा यंदाच्या हंगामात कपाशी लागवडीच्या मजुरीत पन्नास रुपयांची वाढ होऊन ती आता दोनशे रुपये झाली आहे. मजूर मिळत नसल्याने मजुरीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच शेतकऱ्यांना सद्यस्थितीत खते मिळत नसल्याचे चिंता वाढली आहे.
छायाचित्र ओळ : सोयगाव परिसरात पहिली कोळपणी करतांना शेतकरी समाधान बावस्कर.