लोकमत न्यूज नेटवर्कजवळा बाजार : औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार येथील बाजारपेठेतील व्यापाºयांकडून कापसाची ४३५० ते ४४०० रूपये या भावाने खरेदी केली जात असल्यामुळे शेतकरी सीसीआयऐवजी खासगी व्यापाºयांकडेच कापूस विक्री करण्यासाठी पसंती देत आहेत.सीसीआय ४ हजार ३०० या हमीभावाने कापसाची खरेदी करीत आहे. त्यामुळे शेतकºयांना क्विंटलमागे शंभर रुपयांचा भूर्दंड सोसावा लागत आहे. याउलट बाजारपेठेत व्यापारी ४४०० रुपये दराने कापसाची खरेदी करून हा कापूस गुजरात राज्यात पाठवित असल्याची माहिती आहे.व्यापाºयांकडून बाजारपेठेत कापसाला जवळपास १०० रूपयांचा भाव जास्त मिळत आहे. त्यामुळे परिसरातील अनेक शेतकरी आपला कापूस खासगी व्यापाºयांकडे विक्रीसाठी आणत आहेत. त्यामुळे जवळा बाजार येथील बाजारपेठेत कापसाच्या दररोज ६ ते ७ गाड्या बाजारमध्ये भरल्या जात आहेत. सीसीआयपेक्षा जास्त भाव मिळत असल्यामुळे शेतकरी कापसाच्या भाववाढीची आणखी जास्त अपेक्षा न करता आपला कापूस खासगी व्यापाºयांना विक्री करत आहेत. दरम्यान, ढगाळ वातावरणामुळे कापसावर बोंडअळीने हल्ला केला आहे. परिणामी, कापसाचे उत्पादन घटले असून ३ ते ४ क्विंटल बॅगला उतारा येत आहे. तसेच एकाच वेचणीमध्ये कापसाच्या पºहाटी झाली असल्याचे चित्र आहे.
कापसाला मिळतोय ४४०० रुपये भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 23:58 IST
औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार येथील बाजारपेठेतील व्यापाºयांकडून कापसाची ४३५० ते ४४०० रूपये या भावाने खरेदी केली जात असल्यामुळे शेतकरी सीसीआयऐवजी खासगी व्यापाºयांकडेच कापूस विक्री करण्यासाठी पसंती देत आहेत.
कापसाला मिळतोय ४४०० रुपये भाव
ठळक मुद्देजवळा बाजार : व्यापाºयांकडून परराज्यात विक्री