शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: कोरोनाचा निवासी, इंटर्न अन् भावी डाॅक्टरांनी घेतला धसका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2021 07:59 IST

coronavirus: साडेचार वर्षे एमबीबीबीएस, इंटर्नशिप त्यानंतर एमडी, एमएस करण्याचे स्वप्न घेऊन वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या डाॅक्टर, भावी डाॅक्टरांना कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने चिंतेत टाकले आहे.

- योगेश पायघन औरंगाबाद : दहावी, बारावीत रात्रंदिवस मेहनत करून अभ्यास केला. चांगला स्कोअर केल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळाला. आता इथे साडेचार वर्षे एमबीबीबीएस, इंटर्नशिप त्यानंतर एमडी, एमएस करण्याचे स्वप्न घेऊन वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या डाॅक्टर, भावी डाॅक्टरांना कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने चिंतेत टाकले आहे. कोविड, नाॅनकोविडच्या फेऱ्यात पोस्टिंग, थेअरी, परीक्षेकडे होणारे दुर्लक्ष वैयक्तिक नुकसान असल्याची भावना असून, शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी उपाययोजनांची मागणी ते करत आहेत.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) विभागीय टर्शरी सेंटर आहे. शेजारील दहा ते बारा जिल्ह्यांतील दुर्धर आजाराचे रुग्ण उपचारांसाठी येतात. तसेच लाखोंना जीवदान दिलेल्या घाटीचा लाैकिक असल्याने विद्यार्थी इथे शिकण्यासाठी प्राधान्यक्रम देतात. कोरोनामुळे ११७७ खाटांच्या घाटी रुग्णालयातील सुमारे साडेसहाशे खाटा आता कोरोना रुग्णांसाठी राखीव असून, केवळ मेडिसीन विभागच नाही तर सर्वच २२ विभागांचे निवासी डाॅक्टर, वैद्यकीय शिक्षक कोरोना रुग्णांच्या सेवेत आहेत. गेल्या वर्षभरात ६०८८ रुग्णांवर उपचार करण्यात आले. यात निवासी डाॅक्टर आणि इंटर्नचे वर्ष गेले तर एमबीबीएस विद्यार्थ्यांच्याही शिक्षणावर परिणाम झाला. आता दुसऱ्या लाटेने रुग्णांपेक्षा डाॅक्टरांना वैद्यकीय शिक्षणाच्या चिंतेत टाकले असून, कामाच्या तणावात असल्याची परिस्थिती घाटीतील विद्यार्थ्यांनी लोकमतकडे व्यक्त केली. इंटर्नशिपमध्ये प्रत्येक विभागात दीड महिन्याची पोस्टिंग असते. प्रात्यक्षिक शिकायला मिळतात. मात्र, कोरोनामुळे मला ६ महिन्यांत सात पोस्टिंग मिळाल्या. त्यापैकी चार विभागांत थोडेफार शिकता आले. हे माझे वैयक्तिक शैक्षणिक नुकसान आहे. ७० इंटर्न्स पूर्वी जे काम करायचे ते आज ३० इंटर्न्सला करावे लागत आहे. ११ हजार स्टायपेंड व्यतिरिक्त १९ हजार कोविड भत्ता मिळावा, अशी मागणी आहे.-डाॅ. किरण अल्हाट, अध्यक्ष, असोसिएशन ऑफ स्टेट मेडिकल इंटर्न्स (अस्मी), घाटी  

पूर्ण एकवर्षाचे शैक्षणिक नुकसान कोरोनाच्या पहिल्या लाटेत झाले. ते कमी करण्यासाठी उपाययोजना करा हे वारंवार मागणी मार्ड करतेय. २५ मे पासून अंतिम वर्षाच्या परीक्षा आहेत. गेल्यावर्षी मी काही शिकलो नाही तर जुनीयरला काय शिकवणार ? पूर्ण साखळी बिघडत आहे. हे थांबवणे शक्य आहे. ते कंत्राटी वैद्यकीय अधिकारी भरुन थांबवले पाहीजे. -डाॅ. आबासाहेब तिडके, अध्यक्ष, मार्ड, घाटी, औरंगाबाद  

नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना हव्यात दोन वर्षांपासून रुग्णांशी संबंधी येईल म्हणून मायनरची वाट पाहत होतो. आता तिसरे वर्ष म्हणजे मायनर इयरला शिकताना कोरोनामुळे प्रात्यक्षिक बंद झाले. रुग्णांशी संबंध यायचा तो आता येत नाही. केवळ थेअरीवर शिक्षण सुरू आहे. शिकाऊ डाॅक्टर आणि रुग्णातील होणारा संवाद बंद झाल्याने शिकणार काय, असा प्रश्न निर्माण झालाय. शैक्षणिक नुकसान होतंय ते टाळण्यासाठी उपाययोजना झाल्या पाहीजे.-अभिषेक थोरात, एमबीबीएस, विद्यार्थी शेवटच्या म्हणजे मेजर इयरला प्रत्येक विभागात पोस्टिंग मिळतात. त्यातून त्या विभागातील रुग्णांशी संपर्क येतो. काही ऑनलाइन क्लासेस होतात. मात्र, ते तेवढे प्रभावी ठरत नाही. कोरोनामुळे रुग्णच बघायला मिळत नाही. प्रत्येक विभागात एक महिना प्रात्यक्षिक असते. तसे न होता. केवळ थेअरीच्या शिक्षणावर परीक्षा झाली. यात शैक्षणिक नुकसान आहे.- उत्कर्ष देशमुख, एमबीबीएस, विद्यार्थी एमडीचे पहिले वर्ष कोरोनात गेले. आता दुसऱ्या लाटेत दुसरे वर्षही जाण्याची चिंता सतावत आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी वारंवार प्रशासनाला वैद्यकीय अधिकारी, आवश्यक मनुष्यबळ भरण्याची मागणी करत आहोत. त्याकडे दुर्लक्ष करून आता पुन्हा साडेसहाशेहून साडेआठशे बेड केले जात आहे. दुसरे आणि तिसरे वर्ष एमडी, एमएसमध्ये खूप महत्त्वाचे असते. कामाचा व्याप वाढत असताना काय शिकणार याची चिंता सतावतेय.    -डाॅ. भाग्यश्री वाघमारे, निवासी डाॅक्टर, घाटी

टॅग्स :doctorडॉक्टरcorona virusकोरोना वायरस बातम्या