औरंगाबाद : जालन्यातील एका रुग्णासह ६ कोरोनाबाधित रुग्णांचा घाटीत उपचार सुरू असताना मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या ३१५ झाली आहे.
पडेगाव येथील ५५ वर्षीय पुरुष, एसटी कॉलनीतील ७१ वर्षीय महिला, अजिंठा (ता. सिल्लोड) येथील ७० वर्षीय महिला, एन-११ ,हडको येथील ५३ वर्षीय पुरुष, जाधववाडी येथील ५३ वर्षीय महिला आणि जालना येथील ३७ वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा घाटीत उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली.
जिल्ह्यात दीडशे रुग्णांची वाढऔरंगाबाद जिल्ह्यात सोमवारी सकाळी १५० कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यामध्ये औरंगाबाद मनपा हद्दीतील १०१, तर ग्रामीण भागातील ४९ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकुण ६८८० कोरोनाबाधित आढळले असून त्यापैकी ३३७४ रुग्ण बरे झालेले असून, ३१५ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे. त्यामुळे सध्या ३१९१ जणांवर उपचार सुरू आहेत. परीक्षण करण्यात आलेल्या ९३४ स्वॅबपैकी १५० अहवाल सकारात्मक आल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.