कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाली. प्रास्ताविक मंगल काळे यांनी केले. कोविड सेंटरवरच्या रोजची दिनचर्या एका कवितेतून त्यांनी मांडली. डॉ. सुरेश घुले (प्रभारी वैद्यकीय अधिकारी) यांनी कोरोनासंबंधी घ्यावयाच्या काळजीबद्दल माहिती दिली. तसेच डॉ. अर्चना राणे यांनी कोरोना होऊ नये, यासाठी त्रिसूत्रीचा वापर करण्याचा, तसेच कोरोनानंतर घ्यावयाची काळजी याबाबत माहिती दिली. अनेक रुग्णांनी आपले मनोगत व्यक्त करताना सेवा देणाऱ्या सर्वांचे आभार मानले. या वेळी बी. डी. फड, देवेंद्र डेंगले, पी. पी. शहापूरकर, रिता चाबुकस्वार (कोविड सेंटर इन्चार्ज), सुरेश क्षीरसागर (सफाई सुपरवायझर), डॉ. कपिश कुलवाल, डॉ. योगेश जैन, डॉ. योगिता पाटील यांना समई, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी मंगल आबा काळे यांच्यासह सोज्वळ पाटील, हेमांगी शहापूरकर, प्राची पंडित यांनी पुढाकार घेतला.
कोरोना रुग्णांनी केला कोरोना योद्ध्यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:06 IST