शहरं
Join us  
Trending Stories
1
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
2
एके-47 ठेवणाऱ्या डॉ. शाहीनचे थेट महाराष्ट्राशी कनेक्शन; जैशच्या महिला विंगची निघाली मास्टरमाईंड
3
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
4
Govinda Hospitalised : ६१ वर्षीय गोविंदाची अचानक तब्येत बिघडली, झाला बेशुद्ध, जुहूच्या रुग्णालयात दाखल
5
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
6
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट
7
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
8
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
9
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
10
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
11
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
12
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
13
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
14
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
15
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
16
महामुंबईसाठी पद्मश्री पुरस्कार विजेत्यांचा जाहीरनामा
17
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
18
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
19
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
20
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय

कोरोना कहर : ४५९ रुग्णांची वाढ, ५ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:04 IST

औरंगाबाद : जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक होताना दिसून येत आहे. कोरोना रुग्णसंख्येने शुक्रवारी तब्बल चारशेचा आकडा ओलांडला असून, ...

औरंगाबाद : जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक होताना दिसून येत आहे. कोरोना रुग्णसंख्येने शुक्रवारी तब्बल चारशेचा आकडा ओलांडला असून, ४५९ नवे रुग्ण दिवसभरात आढळले, तर ५ बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दिवसभरात १७९ जणांचे उपचार पूर्ण झाल्याने त्यांना विविध रुग्णालयांतून सुटी देण्यात आली असून २९१० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

औरंगाबादेत ८ सप्टेंबर २०२० ला रेकाॅर्ड ब्रेक ४८६ सर्वाधिक बाधित रुग्ण आढळून आले होते. त्यापूर्वी ३ सप्टेंबरला ४६६ रुग्ण बाधित आढळून आले होते. शुक्रवारी ३५३ रुग्ण शहरात, तर ग्रामीणचा आकडाही दुपटीने वाढून १०६ वर पोहोचला. विविध रुग्णालयांतून उपचार पूर्ण झाल्याने शहरातील १५२, तर २७ जण घरी परतले. आजपर्यंत ४७ हजार ९०९ जण कोरोनामुक्त झाले. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ५२ हजार १३ झाली आहे. आजपर्यंत एकूण १२८४ जणांचा मृत्यू झाल्याने २ हजार ९१० रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

---

५ बाधितांचा मृत्यू

घाटीत मुकुंदवाडीतील ६५ वर्षीय पुरूष, खुलताबाद तालुक्यातील नांदराबाद येथील ६६ वर्षीय पुरूष, नंदनवन कॉलनीतील ७९ वर्षीय पुरूष, फुलंब्री तालुक्यातील वडोद बाजार येथील ५८ वर्षीय महिला, खासगी रुग्णालयात ७३ वर्षीय महिला अशा कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

---

मनपा हद्दीत ३५३ रुग्ण

खिंवसरा, एमआयडीसी रोड १, एन सात सिडको ७, जाधववाडी ५, पडेगाव ३, एकनाथनगर ५, ज्योतीनगर ७, नवाबपुरा १, विशालनगर ३, अदालत रोड १, जयनगर १, पद्मपुरा ३, दिवाण देवडी १, छावणी १, आदर्शनगर १, बन्सीलालनगर ३, दशमेशनगर ३, सादियानगर १, बंजारा कॉलनी १, कबीरनगर १, नक्षत्रवाडी १, समर्थनगर ४, वेदांत नगर १, मिटमिटा १, एन सात पोलीस कॉलनी १, खडकेश्वर १, किल्लेअर्क १, नागेश्वरवाडी १, संघर्षनगर १, भावसिंगपुरा १, एन दोन सिडको २, कासलीवाल मार्बल १, एन नऊ २, श्रीनाथ रेसिडन्सी परिसर हर्सुल १, संभाजी कॉलनी १, सिद्धीपार्क जटवाडा रोड ३, गुरू शाश्वत कॉलनी १, सारा परिवर्तन, सावंगी ५, बजरंग चौक १, लक्ष्मण कॉलनी १, दिशा नगरी, बीड बायपास १, गुलमंडी १, इंडियाना रेस्टॉरंट परिसर २, सराफा रोड १, गारखेडा ६, रामनगर १, नारळीबाग २, प्रतापनगर ३, अजबनगर १, बुक मार्केट १, मायानगर १, हडको ३, मुकुंदवाडी ३, सातारा परिसर ५, एन तीन सिडको २, एन आठ सिडको ५, शिवाजीनगर ५, रोकडिया हनुमान कॉलनी १, मित्रनगर २, टीव्ही सेंटर १, गुरू सहानीनगर १, पिसादेवी २, उत्तरानगरी १, राजीव गांधीनगर १, दर्शन विहार, बीड बायपास १, जय भवानीनगर ४, जय भारत कॉलनी चिकलठाणा १, हनुमाननगर १, चौधरी कॉलनी १, फन रेसिडन्सी हॉटेल १, अंबिकानगर १, पुंडलिकनगर ३, गुरू दत्तनगर १, हर्सुल ४, ठाकरेनगर १, बीड बायपास ६, एन बारा, स्वामी विवेकानंदनगर १, छत्रपतीनगर २, इटखेडा १, शिवनेरी कॉलनी ४, द्वारकानगरी १, सिंधी कॉलनी ४, अजंटा हा. सो ३, महर्षी विद्यालय १, सिंधू मेमोरिअल स्कूल १, गादिया विहार १, शिवशंकर कॉलनी १, तापडियानगर १, जय भवानी विद्या मंदिर १, आदित्यनगर १, सूतगिरणी चौक १, जवाहरनगर १, न्यू बालाजीनगर २, एन सहा साईनगर १, म्हाडा कॉलनी ३, टिळकनगर, गारखेडा २, हनुमाननगर १, उल्कानगरी ५, रोशन गेट १, बसयैनगर १, अयोध्यानगर १, राजे संभाजी कॉलनी १, श्रेयनगर २, अरिहंतनगर १, पंचशील नगर १, भानुदासनगर १, न्यू उस्मानपुरा १, नंदनवन कॉलनी ३, एन पाच, सत्यमनगर १, पेठेनगर १, जैननगर १, गवळीपुरा १, बालाजीनगर १, नागसेननगर, उस्मानपुरा २, कांचननगर १, संजयनगर १, सिडको १, एन नऊ एम दोन १, अन्य १३३.

--

ग्रामीण भागात १०६ रुग्ण

पळशी १, बोरगाव १, खुलताबाद २, कन्नड ३, पालगाव १, गंगापूर १, वाळूज ३, फुलंब्री १, बजाजनगर ७, रांजणगाव १, वळद गाव १, अन्य ८४ बाधित आढळून आले.

--

अशी आहे उच्चांकी वाटचाल...

--

४८६ - ८ सप्टेंबर

४६६ - ३ सप्टेंबर

४५९ - ५ मार्च

--

सोमवारपासून खासगी रुग्णालयातून लसीकरण

शहरातील विविध खासगी रुग्णालयांत कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला सुरुवात होणार आहे, अशी माहिती खासगी रुग्णालयांकडून देण्यात आली. आतापर्यंत शासकीय रुग्णालयांतूनच लस मोफत दिली जात आहे. आता खासगी रुग्णालयांतूनही पैसे मोजून लस घेता येईल.