औरंगाबाद : शहरातील हॉटेल्समधील कूक आणि वेटर यांची वर्षातून एकदा आरोग्य तपासणी केली जात असल्याचा दावा अन्न व औषध प्रशासनाने के ला आहे. ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत मात्र, ७० ते ८० टक्के हॉटेल्सचे कूक, वेटरच्या आरोग्याची आणि किचनची तपासणी होत नसल्याची माहिती आहे.शहरातील हॉटेल्समध्ये दिले जाणारे खाद्यपदार्थ आरोग्यदायी वातावरणात तयार केलेले व स्वयंपाकघर स्वच्छ असण्याची ग्राहकांची अपेक्षा असते. दर्जा राखण्यासाठी हॉटेल्समधील कूक आणि वेटर यांच्या आरोग्याची तपासणी होणे हा त्यातील सर्वांत महत्त्वाचा भाग आहे. कूक आणि वेटर यांचे आरोग्य निरोगी असेल तर ग्राहकांना मिळणारी सेवाही तशीच असेल. तसे नसेल तर ग्राहकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. अन्न व औषधी प्रशासन विभागाचे सहआयुक्त चंद्रशेखर साळुंके यांनी यासंदर्भातील माहिती देताना सांगितले की, कोणत्याही हॉटेल्स वा रेस्टॉरंटमधील वेटर आणि कूक यांच्या आरोग्याची तपासणी ही दर सहा महिन्यांनी एकदा होणे आवश्यक आहे. त्यांची तपासणी करून घेण्याची जबाबदारी हॉटेलमालक वा चालकाची असते. त्यांनी आपल्या हॉटेलमध्ये किती वेटर व कूककाम करतात या माहितीसह त्यांच्या आरोग्याची तपासणी केल्याची माहिती आम्हाला पाठविणे आवश्यक आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाकडून वर्षातून एकदा वेटर आणि कूक यांच्या आरोग्य व किचनची तपासणी केली जाते. हॉटेलमालकाने तज्ज्ञ डॉक्टरांकडूनच वेटर व कूकच्या आरोग्याची तपासणी करून घ्यावी. एखाद्या हॉटेलमधील वेटर व कूकची आरोग्य तपासणी झाली नसेल किंवा चालकाकडून त्याकडे दुर्लक्ष होत असेल, तर प्रशासन नोटीस पाठविते. या नोटिसीनेही काही फरक पडत नसेल तर त्या हॉटेलचा परवाना काही दिवसांसाठी निलंबित केला जातो, असेही साळुंके यांनी सांगितले.अन्न व औषध प्रशासन असा दावा करीत असले तरी शहरातील बहुतांश हॉटेल्समधील वेटर व कूकच्या आरोग्याची तपासणी तीन-तीन वर्षे होत नाही. किचन तपासणीचाही नियम पाळला जात नाही. किचनमध्ये वापरण्यात येणाऱ्या साहित्याची माहितीदेखील ग्राहकांना असणे आवश्यक असते. प्रत्यक्षात कोणत्याही हॉटेलमध्ये कोणते तेल वापरले जाते किंवा अन्य साहित्याची माहिती दिली जात नाही. नियम काय आहेत? प्रशासनातर्फे वर्षातून एकदा किचन तपासणी होणे आवश्यक.हॉटेलचालकाने तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत वेटर व कूकची दर सहा महिन्यांनी आरोग्य तपासणी करून घ्यावी.किचनमध्ये वापरल्या जाणाऱ्या साहित्याची (तेल, तूप) माहिती सूचना फलकावर लावणे आवश्यक.किचनमध्ये काम करताना घ्यायची काळजीकूकने अॅप्रन, हेड कॅप आणि हँड ग्लोव्हज व वेटरने हेड कॅप आणि हँडग्लोव्हज वापरावेत. वेटर व कूकने कामाच्या ठिकाणचे शूज व अन्य साधने, वस्तू फक्त कामाच्या ठिकाणीच वापराव्यात.नियमित तपासणी नाहीमी गेल्या चार वर्षांपासून या हॉटेलमध्ये काम करीत आहे. माझी फक्त सुरुवातीला एकदाच आरोग्य तपासणी करण्यात आली होती. मला बरे वाटत नसतानादेखील कामावर यावेच लागते. वेटरचे आरोग्य निरोगी असेल तरच तो ग्राहकाला योग्य व चांगली सेवा देऊ शकेल. यासाठी त्यांच्या आरोग्याची नियमित तपासणी होणे आवश्यक आहे.-सखाराम (वेटर)माहिती घेतली जात नाहीकोणताही ग्राहक किचनच्या स्वच्छतेसंदर्भातील माहिती घेण्यासाठी येत नाही. किचनमध्ये वापरण्यात येणाऱ्या वस्तूंची माहितीदेखील प्रशासनाने घेणे आवश्यक आहे. किचन स्वच्छतेची पाहणीही नियमित होणे गरजेचे आहे; परंतु असे कोणाकडूनही केले जात नाही. -राममोहन शिंदे, कूकवेटर व कूकची संख्या छोट्या हॉटेल्समध्ये साधारणत: १०, तर स्टार हॉटेल्समध्ये एरियावाईज वेटर व कूक संख्या ठरते.
कूक, वेटरच्या आरोग्य तपासणीचा होतोय दावा
By admin | Updated: June 18, 2014 01:35 IST