शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

वाळूज उद्योगनगरी जडवाहनांनी घेतला रस्त्याचा ताबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 23:31 IST

वाळूज उद्योगनगरीत अवजडवाहनांनी रस्त्याचा ताबा घेतल्यामुळे वाहतुकीची सतत कोंडी होत आहे.

वाळूज महानगर : वाळूज उद्योगनगरीत अवजडवाहनांनी रस्त्याचा ताबा घेतल्यामुळे वाहतुकीची सतत कोंडी होत आहे. अनेक कंपन्यांसमोर मालाची ने-आण करणाऱ्या वाहनांच्या रस्त्याच्या दुतर्फा रांगा लागत असल्याने अपघाताचा धोकाही बळावला आहे.

वाळूज एमआयडीसीत लहान-मोठे ३ हजारांवर कारखाने आहेत. या कारखान्यात लागणारा कच्चा व पक्क्या मालाची ट्रक, कंटेनर, टेम्पो आदी जडवाहनांतून वाहतूक केली जाते. याचबरोबर कारखान्यातून तयार होणारे साहित्य व माल विविध ठिकाणी वाहनांतून पोहचविण्यात येतात. मात्र, ही वाहने कारखान्यासमोर उभी केली जात असल्याने रहदारीस अडथळा निर्माण होत आहे.

औद्योगिक परिसरात एमआयडीसीचे कामगार चौकात बीओटी तत्त्वावर एक वाहनतळ आहे. मात्र या त्याचीही दुरावस्था झाली असून, या ठिकाणी सुविधाचा अभाव आहे. काही वाहनचालक वाहनतळाचे शुल्क वाचविण्यासाठी रस्त्यावर वाहने उभी करीत असल्याचे चित्र औद्योगिकनगरीतील अनेक सेक्टरमध्ये पहावयास मिळते. या प्रकारामुळे इतर वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. रस्त्यावर जडवाहने उभी करणाऱ्यांकडे एमआयडीसी प्रशासन व वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांतून केला जात आहे.

कंपन्यासमोर जडवाहनाच्या रांगाया भागातील आॅटो क्लस्टर, व्हेरॉक, सिमेन्स, मायलान कंपनी, गुडईअर, गरवारे गेट, एनआरबी चौक, आंबेडकर चौक, कामगार चौक आदी ठिकाणी कंपनीसमोरच जडवाहनांच्या रांगा दिसून येतात. याकडे एमआयडीसी प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप उद्योजक डॉ.शिवाजी कान्हेरे, राहुल मोगले, अब्दुल शेख, अर्जुन आदमाने आदींनी केला आहे.

नवीन वाहनतळाचा प्रस्ताव धुळखात पडूनवाळूज उद्योनगरीत एमआयडीसी प्रशासनाकडून कामगार चौकात वाहनतळ उभारले आहे. या शिवाय बजाज आॅटोकडून कंपनीत येणाºया वाहनांसाठी स्वतंत्र वाहनतळ आहे. एमआयडीसी प्रशासनाकडून फोस्टर कंपनीजवळ नवीन वाहनतळ उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र या नवीन वाहनतळाचा प्रस्ताव धूळखात असल्यामुळे उद्योनगरीतील वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनला आहे.

टॅग्स :Waluj MIDCवाळूज एमआयडीसी