शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

पूर्णवादी बँकेवर फडकला निरंतर पॅनलचा झेंडा

By admin | Updated: April 22, 2015 00:41 IST

बीड : येथील पूर्णवादी नागरी सहकारी बँकेच्या संचालक मंडळावर डॉ. निरंतर यांच्या पॅनलने वर्चस्व प्रस्थापित करीत सर्वच्या सर्व पंधराही जागा आपल्या ताब्यात घेत यंदाही आपले वर्चस्व त्यांनी कायम ठेवले

बीड : येथील पूर्णवादी नागरी सहकारी बँकेच्या संचालक मंडळावर डॉ. निरंतर यांच्या पॅनलने वर्चस्व प्रस्थापित करीत सर्वच्या सर्व पंधराही जागा आपल्या ताब्यात घेत यंदाही आपले वर्चस्व त्यांनी कायम ठेवले. विशेष म्हणजे अनेक उमेदवारांची अनामत रक्कमही जप्त झाली असल्याने परिवर्तनास मतदारांनी सपशेल नाकारले असल्याचे या निकालावरून स्पष्ट झाले आहे.बीड शहरातील मजूर संस्था कार्यालयात सकाळी ९ वाजता मतमोजणीला सुरूवात झाली. सकाळपासूनच डॉ. निरंतर यांचे पॅनल आघाडीवर होते. शेवटपर्यंत त्यांची आघाडी कायम राहिली. पंधरा जागांसाठी ३२ उमेदवार रिंगणात होते. रविवारी त्यासाठी मतदान झाले होते. ७ हजार ६४५ सभासदांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. यावेळी परिवर्तन हवे यासाठी विरोधकांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. मात्र त्यांना यंदाही यश मिळाले नाही. पंधराच्या पंधरा जागांवर ताबा मिळवून परिवर्तन पॅनलचा धुव्वा उडवूण टाकण्यात यश मिळाले आहे. निकाल मंगळवारी रात्री ९ वाजता निवडणूक निर्णय अधिकारी व्ही.एस. जगदाळे यांनी जाहीर केला. मात्र ६ वाजल्यापासूनच गुलालाची उधळण सुरु होती. यानंतर एकच जल्लोष साजरा करण्यात आला. स.नि.अधिकारी आर.एस. ठोसर, सुनील जाधव यांच्यासह कर्मचाऱ्यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)निवडणुकीत विजयी झालेले निरंतर पॅनलचे उमेदवारसर्वसाधारण- निरंतर अरूण गोविंद (६५१२),वैद्य शरदराव रामचंद्र (६३६८), बाहेगव्हाणकर मधुकर शामराव (६३४४), लऊळकर जयंत सदाशिव (६३३७), शिरपूरकर जगदीश अनंतराव (६२३८), मानुसमारे विश्वनाथ (६२२९), कलंत्री ओमप्रकाश आसाराम (६२१९),देशपांडे अमित श्रीकांत (६१९०), तेंडुलकर सुहास मंगेशराव (६११८), देशपांडे किरण सुरेशराव (६१७५), महिला प्रवर्ग- रायते कुसुम शरदराव (६४६१), हुलजुते सरोज शहादेव (६२६३), भ.जा.वि.ज.-सानप चंद्रकांत भोजीबा (६४६१) अनु. जाती- सवाई रामराव किसनराव (६४६२), इ.मा.व.- क्षीरसागर पांडुरंग नामदेव (६५२९).