शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम विभाग बुचकळ्यात!

By admin | Updated: December 27, 2016 23:55 IST

उस्मानाबाद : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक विभागाने निवडणुकीच्या तीन महिने अगोदर निधी खर्च करून कामे करण्यास प्रतिबंध केला आहे

उस्मानाबाद : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक विभागाने निवडणुकीच्या तीन महिने अगोदर निधी खर्च करून कामे करण्यास प्रतिबंध केला आहे. तसे पत्र जिल्हा परिषदेला पाठविले आहे. परंतु, सदरील पत्रावरून बांधकाम विभाग चांगलाच बुचकळ्यात सापडला आहे. सदरील पत्रान्वये जिल्हा परिषद स्व:निधीतील की आमदार, खासदार निधीतील कामांना प्रतिबंध आहे, हे स्पष्ट होत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.सध्या जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. येणाऱ्या काळात कुठल्याही क्षणी आदर्श आचारसंहिता लागू शकते. असे असतानाच दुसरीकडे जिल्हा परिषदेचा बांधकाम विभाग संभ्रमावस्थेत सापडला आहे. त्याला कारणही तसेच आहे. राज्य निवडणूक आयोगाने जि.प., पं.स. निवडणूक आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर एक पत्र पाठविले आहे. सदरील पत्रानुसार निवडणुकीपूर्वी तीन महिने अगोदर निधी खर्च करून कामे करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. परंतु, कोणत्या निधीअंतर्गतच्या कामांना प्रतीबंध आहे, याचा बोध ‘बांधकाम’मधील अधिकाऱ्यांना होत नाही. प्रस्तूत प्रतिनिधीने मंगळवारी बांधकाम विभागातील जबाबदार अधिकाऱ्यांकडे तसेच संबंधित टेबलप्रमुखांकडे विचारणा केली असता, प्रत्येकजण संभ्रमावस्थेत असल्याचे पहावयास मिळाले. जो-तो दुसऱ्याकडे बोट दाखविताना दिसून आले. निवडणूक आयोगाच्या पत्राबाबत अंमलबजावणी करणारे अधिकारीच संभ्रमावस्थेत असतील, तर निधी खर्च करणार कसा? असा सवाल आता उपस्थित होवू लागला आहे. दरम्यान, बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांना पत्राबाबत माहिती असेल या अपेक्षेने कंत्राटदारही बांधकाम विभागात खेटे मारीत आहेत. परंतु, त्यांनाही समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याने एकूणच गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे याबाबतीत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून संभ्रम दूर करण्याची मागणी आता होवू लागली आहे.(प्रतिनिधी)