शहरं
Join us  
Trending Stories
1
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
2
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
3
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
4
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
5
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
6
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
7
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
8
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
9
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
10
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
11
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
12
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
13
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
14
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
15
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
16
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
17
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
18
“मुंबई महापालिका कुणी लुटली, हे मुंबईच्या जनतेला माहिती आहे”; संजय राऊतांचा पलटवार
19
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
20
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस

काँग्रेसने रेल्वे रोखली !

By admin | Updated: June 26, 2014 00:37 IST

लातूर : मोदी सरकारने रेल्वेच्या प्रवास व मालवाहतुकीच्या दरात भरमसाठ वाढ केली आहे. याच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाने बुधवारी सकाळी लातूर रेल्वे स्टेशनवर रेलरोको आंदोलन केले.

लातूर : महिनाभरापूर्वीच सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने रेल्वेच्या प्रवास व मालवाहतुकीच्या दरात भरमसाठ वाढ केली आहे. याच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाने बुधवारी सकाळी लातूर रेल्वे स्टेशनवर रेलरोको आंदोलन केले. लातूर रेल्वे स्टेशनवर बुधवारी सकाळी ९.३५ वाजता परळी-मिरज ही गाडी काँग्रेस कार्यकर्त्यांनी रोखून धरत केंद्र सरकार व रेल्वे दरवाढीच्या निर्णयाविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करीत बराचवेळ हे आंदोलन केले. या आंदोलनात राज्य साक्षरता परिषदेचे अध्यक्ष अ‍ॅड. त्र्यंबकदास झंवर, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. व्यंकट बेद्रे, शहर जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. समद पटेल, जि.प. अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे, महापौर स्मिता खानापुरे, रेणा साखर कारखान्याचे चेअरमन यशवंत पाटील, विकास कारखान्याचे व्हा. चेअरमन विजय देशमुख, माजी जि.प. अध्यक्ष संतोष देशमुख, बाजार समितीचे सभापती विश्वंभर मुळे, मनपा गटनेते नरेंद्र अग्रवाल, महिला काँग्रेस शहर जिल्हाध्यक्षा संगीता मोळवणे, पं.स. सभापती मंगलप्रभा घाडगे, माजी उपनगराध्यक्षा खाजाबानू बुऱ्हाण, नरेश पंड्या, किशनराव लोमटे, संभाजी सूळ, दगडू पडिले, सर्जेराव मोरे, भानुदास डोके, महेश घार, मदनराव भिसे, सोनू डगवाले, बालाजी सुरवसे, अंगद सूर्यवंशी, नबी नळेगावकर, रफिक सय्यद, सुनीता आरळीकर, स्वाती जाधव, रेखा शिखरे, जफर पटेल, बिभीषण सांगवीकर यांच्यासह काँग्रेस व विविध सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)जनतेच्या प्रश्नांवर काँग्रेस आक्रमक होणार...विविध आश्वासने देऊन सत्तेवर बसलेल्या मोदी सरकारने जनतेच्या हिताविरुद्ध निर्णय घेणे सुरू केले आहे. रेल्वे प्रवास दरवाढीवरून केंद्र सरकारचा खोटारडेपणा उघड झाला आहे. लवकरच गॅस आणि पेट्रोलच्याही दरात वाढ होण्याचे संकेत या सरकारने दिले आहेत. यापूर्वीच्या काळात उठसूठ आरोप करणाऱ्या आता केंद्राच्या सत्तेत बसणाऱ्या लोकांचा दुटप्पीपणा स्पष्ट झाला आहे. जनभावना लक्षात घेऊन भविष्यात जनतेच्या प्रश्नावर काँग्रेस अधिक आक्रमकपणे रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. व्यंकट बेद्रे म्हणाले. दरवाढ मागे घ्या... अच्छे दिन आयेंगे म्हणून केंद्राच्या सत्तेत बसलेल्या शासनाने काही दिवसांतच रेल्वेच्या दरात प्रचंड वाढ करून जनतेच्या खिशाला कात्री लावली आहे. ही दरवाढ पूर्णत: मागे घेण्यात यावी, अशी मागणी यावेळी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली.