फुलंब्री तालुक्यात पेट्रोलचे भाव प्रतिलिटर शंभर रुपयांच्या वर, तर डिझेलचे भाव प्रतिलिटर ९० च्या वर गेले आहेत. तसेच गॅसच्या किमतीही वाढलेल्या आहेत. याला पूर्णपणे केंद्र सरकार जबाबदार आहे. केंद्र सरकारने सर्व सामान्य नागरिकांवर महागाई लादलेली असून, नागरिक यात होरपळत आहेत. याविरोधात ही निदर्शने असल्याचे काँग्रेसचे फुलंब्री तालुकाध्यक्ष संदीप बोरसे यांनी सांगितले. यावेळी सुदाम मते, युवक काँग्रेसचे अध्यक्ष ज्ञानेश्वर जाधव, महिला आघाडीच्या अध्यक्ष सुनीता मारग, वरुण पाथ्रीकर, शहरअध्यक्ष मुद्दस्सर पटेल, पंढरीनाथ जाधव, पुंडलिकराव जंगले, मंगेश मेटे, सदाशिव विटेकर, अंबादास गायके, इद्रिस पटेल, सुरेश मुळे, संजय वाहटुळे, अंकुश गायकवाड, रामेश्वर गाडेकर, जमीर पठाण, शेख रज्जाक, राजेंद्र जाधव, कुंदन बोरसे आदींसह अनेकांची उपस्थिती होती.
फोटो कॅप्शन : फुलंब्री येथे इंधन दरवाढीच्या विरोधात निदर्शने करताना संदीप बोरसे, सुनीता मारग, वरुण पाथ्रीकर, मुद्दसर पटेल, ज्ञानेश्वर जाधव आदी.
070621\img-20210607-wa0116_1.jpg
फुलंब्री येथे इधन दरवाढीच्या विरोधात निदर्शने करताना संदीप बोरसे, सुनिता मारग,वरुन पाथ्रीकर, मुद्दसर पटेल, ज्ञानेश्वर जाधव आदी.