माजलगाव: केंद्र शासनाने केलेल्या पेट्रोल, डिझेल, गॅस व जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीने सर्वसामान्य जनतेचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. या दरवाढीच्या विरोधात माजलगाव तालुका काँग्रेसच्या वतीने रविवारी सायकल व मोटारसायकल ढकलून शहरातून फेरी काढत आपला संताप व्यक्त केला.मागील काही दिवसांपूर्वीच रेल्वे दरवाढ केंद्र शासनाने केली होती. या रेल्वे दरवाढी पाठोपाठच शासनाने पुन्हा एकदा सर्वसामान्यांना धक्का दिला आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस अशा जीवनावश्यक वस्तूंचे भाव केंद्र शासनाने वाढविले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना जीवन जगणे कठीण बनले आहे. केंद्र शासनाच्या निर्णयाच्या विरोधात आणि महागाई कमी, करावी, या मागणीसाठी तालुका काँग्रेसच्या वतीने रविवारी नारायण होके यांच्या नेतृत्वाखाली शहरातून सायकल व मोटारसायकल ढकलून फेरी काढली व आपला संताप व्यक्त केला. शहरातील शिवाजी चौकात दरवाढीच्या विरोधात घोषणाबाजी करीत कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. शहराध्यक्ष शेख अहेमद, अॅड. इनामदार, विनोद सुरवसे, शेख रशीद, राजेश शिंदे, शिवहार सेलूकर, माऊली पांचाळ, शेख जानूशहा, अतिक पठाण, रामराजे रांजवण, समियोद्दीन अन्सारी, शेख जुबेर, अशोक काळे आदी सहभागी झाले होते. (वार्ताहर)
दरवाढी विरोधात काँग्रेसची निदर्शने
By admin | Updated: July 7, 2014 00:09 IST