शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

भाजपने दाखल केलेला काँग्रेसच्या सभापती विरोधातील अविश्वास ठराव १३ विरुद्ध शून्य मताने मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 17:16 IST

जाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय औताडे (काँग्रेस) यांच्या विरोधात भाजपच्या संचालकांनी आणलेला अविश्वास ठराव पास झाला आहे.  

ठळक मुद्दे काँग्रेसचे ३ संचालक फुटले१३ विरुद्ध शून्य मताने भाजपाने मारली बाजी  सभापतीपदासाठी  राधाकिसन पठाडे यांच्या नावाची चर्चा

औरंगाबाद, दि. २२  : जाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय औताडे (काँग्रेस) यांच्या विरोधात भाजपच्या संचालकांनी आणलेला अविश्वास ठराव पास झाला आहे.  काँग्रेसचे ३ संचालक फोडण्यात भाजपाला यश आले असून १३ विरुद्ध शून्य एवढ्या फरकाने औताडे यांना पदावरून पाय उतार व्हावे लागले. 

जाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय औताडे यांच्या विरोधात मागील ११ आॅगस्ट रोजी उपसभापती (भाजपा) भागचंद ठोंबरे यांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. जिल्हाधिका-यांनी आज मंगळवारी या प्रस्तावावर विशेष सभा बोलविली होती. त्यासाठी उपविभागीय अधिकारी शशिकांत हदगल यांची नेमणूक करण्यात आली. 

जाधववाडीतील बाजार समितीच्या हॉलमध्ये दुपारी २ वाजता भाजपाचे संचालक तसेच व्यापारी व हमाल-मापाडी संचालक व काँग्रेसचे ३ संचालक दाखल झाले. यानंतर उपविभागीय अधिकारी हदगल यांनी सभेचे सुत्रहाती घेतली. पराभव दिसत असल्याने सभापती संजय औताडे व काँग्रेसचे संचालक या सभेला आलेच नाही.  औताडे यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल केला.  १३ संचालकांनी हात वरती करुन त्यास पाठींबा दिला. १३ विरुद्ध शून्य असा अविश्वास ठराव पास झाला.

काँग्रेसचे बाबासाहेब मुगदल, राधाकिसन पठाडे व शिवाजी वाघ यांनी भाजपला साथ दिली तसेच हमाल-मापाडी संचालक देवीदास किर्तीशाही यांनीही काँग्रेसची साथ सोडून भाजपाच्या ठरावाला पाठींबा दिला. भाजपाचे ७ संचालक, २ व्यापारी संचालक व ३ काँग्रेसचे संचालक व १ हमालमापाडी असे १३ मते अविश्वास ठरावाच्या बाजूने पडली. अवघ्या १५ मिनीटात विशेष सभा संपली. यामुळे मागील दोन वर्षांपासून बाजार समितीवर असलेली काँग्रेसची सत्ता संपुष्टात आली. अविश्वास ठराव जिंकताच भाजपाच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष  केला.  

सभापतीपदासाठी  राधाकिसन पठाडे यांच्या नावाची चर्चासभापती संजय औताडे यांची साथ सोडून काँग्रेसमधून भाजपामध्ये उडी मारणारे संचालक राधाकिसन पठाडे यांच्या नावाची चर्चा सभापतीपदासाठी सुरु झाली आहे. कारण, काँग्रेसचे संचालक फोडण्यात यांचा मोठा वाटा होता व सभापतीपद मिळाले तरच अविश्वास ठरावाला पाठींबा देईल, अशी अटच त्यांनी घातली होती, अशी चर्चा दिवसभर बाजार समितीमध्ये सुरु होती. याशिवाय बाबासाहेब मुगदल, दामोधर नवपुते याच्याही नावाची चर्चा होती.