शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण समितीच्या बैठकीचा गोंधळ

By admin | Updated: July 9, 2014 00:53 IST

औरंगाबाद : आर्थिकदृष्ट्या दुर्बल व एससी, एसटी प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या २५ टक्के जागांवर प्रवेश देण्यात शाळांकडून मनमानी होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.

औरंगाबाद : आर्थिकदृष्ट्या दुर्बल व एससी, एसटी प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या २५ टक्के जागांवर प्रवेश देण्यात शाळांकडून मनमानी होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यीय समिती नेमण्याचा निर्णय जिल्हा परिषद शिक्षण समितीच्या बुधवारी (दि. १८ जून) झालेल्या मासिक बैठकीत घेण्यात आल्याचे सांगण्यात आला खरे, मात्र चौकशी समिती नेमण्याचा ठराव घेण्यात आला की नाही, यावरूनच आता वाद उत्पन्न झाला आहे. सभापती व सदस्य म्हणतात, ठराव घेतला, तर शिक्षणाधिकारी म्हणतात, तसा कोणताही ठराव घेतलेला नाही. त्यामुळे विषय समितीच्या बैठकांचे गांभीर्य कोणाला किती आहे, हा प्रश्नही निर्माण होतो आहे. शिक्षण सभापती बबन कुंडारे यांच्या अध्यक्षतेखाली सदर बैठक झाली होती. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यानुसार आर्थिकदृष्ट्या दुर्बल व मागासवर्गातील विद्यार्थ्यांना राखीव असलेल्या २५ टक्के जागांवर खाजगी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधून प्रवेश दिला जात नसल्याच्या तक्रारी प्रारंभी सदस्यांनी केल्या होत्या. तसेच जिल्हा परिषदेकडेही संदर्भात अनेक तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या. त्यामुळे संबंधित शाळांच्या प्रवेश प्रक्रियेची चौकशी करावी, अशी मागणी सदस्यांनी केली.त्यानुसार या शाळांची चौकशी करण्यासाठी सभापती कुंडारे यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु सदर बैठकीत इतर दोन सदस्यांची निवड करण्यात आली नव्हती. शाळा सुरू झाल्यानंतर उशिरा ही समिती स्थापन करण्याचा निर्णय झाल्याने समितीचा मूळ उद्देशच पूर्ण होत नव्हता. त्यात गेल्या तीन आठवड्यात काय कारवाई झाली, याचा पाठपुरावा लोकमत प्रतिनिधीने केला असता, नव्याच वादास तोंड फुटले. विशेष म्हणजे जिल्ह्यातील काही विनाअनुदानित शाळांमध्ये शिक्षकांना शासन नियमानुसार मासिक वेतन दिले जात नाही. त्यांना नाममात्र मानधनावर राबविले जाते. त्यांच्या तक्रारी आल्या होत्या. अशा काही महत्त्वाच्या प्रश्नांची आणि तक्रारींची चौकशी ही समिती करणार होती. ठराव घेतलामागास विद्यार्थ्यांना २५ टक्के राखीव जागांवर प्रवेश देण्यात होत असलेल्या अनागोंदीची चौकशी करण्यासाठी माझ्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याचा ठराव समितीच्या मासिक बैठकीत घेण्यात आला आहे. परंतु त्यात अद्याप काहीही कारवाई प्रशासनाने केल्याचे दिसत नाही. बबन कुंडारे, शिक्षण सभापतीअसा ठराव झालाच नाहीसमिती स्थापन करण्याचा ठराव झालेला नाही. त्याऐवजी १० शाळांमागे एक अधिकारी नेमण्यावर चर्चा झाली. हे अधिकारी सदर प्रवेश प्रक्रियेवर लक्ष ठेवणार होते. त्याप्रमाणे अधिकारी नेमले आहेत. एम. के. देशमुख, शिक्षणाधिकारी, जि.प.निर्णय झाल्याची चर्चातसा ठराव झाल्याची चर्चा मी ऐकली आहे. परंतु ती चर्चा माझ्या अगोदर झाली असावी. प्रभाकर काळे, सदस्य, शिक्षण समितीसमितीचे काम दिसत नाहीसभापती कुंडारे यांच्या अध्यक्षतेखालील समितीत शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी यांचा समावेश करण्याचा ठराव झाला होता. परंतु समितीचे काम अद्याप काहीही दिसत नाही. मधुकर वालतुरे, श्याम राजपूत, नियुक्त सदस्य, शिक्षण समिती