शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

फटाका मार्केटवर संभ्रम कायम; चेंडू पोलीस आयुक्तांकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 00:42 IST

फटाका मार्केटचे अंतर निवासी भागापासून २५० मीटर दूर मोकळ्या जागेत असावे, असे आदेश आहेत. यानुसार शहर व परिसरातील १० फटाका मार्केटची पाहणी करून परवानगी द्यायची का नाही, याचा निर्णय पोलीस आयुक्त यशस्वी यादव घेणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : फटाका मार्केटचे अंतर निवासी भागापासून २५० मीटर दूर मोकळ्या जागेत असावे, असे आदेश आहेत. यानुसार शहर व परिसरातील १० फटाका मार्केटची पाहणी करून परवानगी द्यायची का नाही, याचा निर्णय पोलीस आयुक्त यशस्वी यादव घेणार आहेत. या नियमात एकही फटाका मार्केट बसत नाही. यामुळे फटाका विक्रेत्यांमध्ये निर्माण झालेला संभ्रम गुरुवारीही कायम होता.मागील वर्षी जिल्हा परिषद मैदानावर फटाका मार्केटला मोठी आग लागली होती. यात संपूर्ण दुकाने जळून खाक झाली होती. नुकताच मुंबई उच्च न्यायालयाने निवासी भागात फटाका मार्केटला परवानगी देऊ नये, असे आदेश दिला आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तालय, महानगरपालिका प्रशासन सावधगिरीने पावले उचलत आहेत. रेल्वेस्टेशन परिसरातील अयोध्यानगरी, हडकोतील टीव्ही सेंटर मैदान, फरशी मैदान, सिडको राजीव गांधी क्रीडांगण, शिवाजीनगर, एन-२, चिकलठाणा, मुकुंदवाडी, पंढरपूर, रांजणगाव आदी ठिकाणी सुमारे ३०० विक्रेत्यांना परवानगीची प्रतीक्षा आहे. निवासी भागापासून २५० मीटर दूर फटाका मार्केट असेल तरच परवानगी देण्यात येईल, अशी भूमिका पोलीस आयुक्तांनी घेतली. त्यानुसार पोलीस विभाग, पोलीस वाहतूक विभाग, बांधकाम विभागाचे अधिकारी यांनी आज विविध ठिकाणच्या फटाका मार्केटची पाहणी केली. निवासी भागापासून किती दूर आहे याची मोजणीही केली. सायंकाळी याचा अहवाल पोलीस आयुक्तांना देण्यात आला. आता पोलीस आयुक्त काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.