उंडणगाव : येथे सुरू असलेल्या संतश्रेष्ठ कैवल्यसम्राट चक्रवर्ती ज्ञानोबारायांच्या ७२५ व्या संजीवनी समाधी सोहळ्यानिमित्त, ज्ञानेश्वरी पारायण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी या सोहळ्याची काल्याच्या किर्तनाने सांगता झाली. कोरोनाच्या सावटात नियमावलींचे पालन करून हा सोहळा उत्साहात पार पडला आहे.
उडंणगावातील संत सतीआई मंदिर परिसरात या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. पाच दिवसाच्या या कार्यक्रमाने गावात आनंद उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. पारायण सोहळ्याचे वाचन भागवताचार्य हभप नागेश महाराज कदम यांनी केले. काकडा आरतीपासून ते रात्रीच्या हरिकिर्तनापर्यंत हा कार्यक्रमांची रेलचेल होती. रविवारी भागवताचार्य हभप नागेश महाराज कदम यांचे काल्याचे किर्तन व महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली. बाबुशेठ पंडित, पवार यांनी महाप्रसादासाठी योगदान दिले. सोहळा यशस्वी करण्यासाठी उंडणगाव येथील गावकरी मंडळींनी परिश्रम घेतले.
फोटो कॅप्शन : उंडणगावातील पाच दिवसीय ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यात किर्तनसेवा करताना हभप नागेश महाराज कदम