लोक अदालतमध्ये आज प्रथमच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तडजोड होऊन हर्सूल मध्यवर्ती कारागृहातील आरोपीला मोटार अपघात प्रकरणात एक लाख रुपये नुकसान भरपाई मिळाली. आरोपीच्या वतीने एड. बोचरे यांनी काम पाहिले. त्याच प्रमाणे वित्तीय संस्थेचे प्राधिकृत अधिकारी पॅनलसमोर प्रत्यक्ष हजर राहू शकत नव्हते. म्हणून संस्थेच्या पॅनलवरील वकिलांमार्फत प्राधिकृत अधिकाऱ्यांसोबत व्हाॅट्सॲप व्हिडिओ कॉलिंगद्वारे संपर्क साधून ९० प्रकरणांमध्ये तडजोड करण्यात आली.
जम्मू काश्मीरमध्ये कार्यरत असलेल्या भारतीय सेनेमधील जवानास अपघात प्रकरणामध्येे दीड लाख रुपये नुकसान भरपाई मिळाली. १३ जुलै २०१९ रोजी रांजणगाव शेणपुंजी येथील रस्त्यावरून पायी जात असताना या जवानाला ट्रॅक्टरने धडक दिली होती. यात दुखापत होऊन त्यांच्या डोक्याला व उजव्या हाताला जखमा झाल्या होत्या. या प्रकरणात त्यांना नुकसान भरपाई मिळाली.