प्रलंबित प्रकरणांमध्ये ३१,०१,१४,३२६ आणि वादपूर्व प्रकरणांमध्ये २ कोटी २२ लाख ९३ हजार ३९८ ची वसुली झाली. अशी एकूण ३३,२४०,७७,२४ एवढ्या रकमेचा समावेश असलेली प्रकरणे तडजोडीने लोकअदालतमध्ये मिटली.
६६२ प्रकरणांमध्ये वेगवेगळ्या वित्तीय संस्थांचे २२,२९३,३९८ रुपये वसूल झाले. तर धनादेश अनादराच्या १००० प्रकरणांमध्ये तडजोड होऊन २१ कोटी ८८ लाख ८८ हजार २२० रुपये मिळाले. भूसंपादनाच्या ११ प्रकरणांतील शेतकऱ्यांसोबत नुकसान भरपाईबाबत तडजोड झाली. अपघातामध्ये जखमी झालेल्या ९२ प्रकरणांतील लोकांना व त्यांच्या नातेवाईकांना २३,८८,००,०० रुपये नुकसान भरपाई मिळाली. ५० कौटुंबिक प्रकरणांत संबंध पूर्ववत झाले. १५६ दिवानी प्रकरणातील पक्षकारांनी आपसात मतभेद मिटविले. २२ विद्युत चोरीच्या प्रकरणांमध्येही तडजोड झाली आणि ७७ फौजदारी प्रकरणांतील किरकोळ वाद संपुष्टात आले. लोकअदालतमुळे पक्षकारांना मतभेद मिटविता आले व त्यांचा पैसा आणि वेळ वाचला.
जिल्हा विधि सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीपाद टेकाळे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व न्यायिक अधिकाऱ्यांनी लोकअदालतमध्ये भाग घेतला.