शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

महापौर, आयुक्त, उपायुक्तांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 00:18 IST

गोदावरी नदी प्रदूषणास जबाबदार असल्याचा ठपका ठेवत महापौर शैलजा स्वामी, आयुक्त गणेश देशमुख आणि उपायुक्त रत्नाकर वाघमारे यांच्याविरूद्ध पर्यावरण कायद्यांतर्गत नांदेड मुख्य न्याय दंडाधिकारी न्यायालयात फौजदारी गुन्हा नोंदविण्यात आल्याची माहिती पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी शनिवारी दिली

नांदेड : गोदावरी नदी प्रदूषणास जबाबदार असल्याचा ठपका ठेवत महापौर शैलजा स्वामी, आयुक्त गणेश देशमुख आणि उपायुक्त रत्नाकर वाघमारे यांच्याविरूद्ध पर्यावरण कायद्यांतर्गत नांदेड मुख्य न्याय दंडाधिकारी न्यायालयात फौजदारी गुन्हा नोंदविण्यात आल्याची माहिती पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी शनिवारी दिली.पर्यावरणमंत्री कदम यांनी जून महिन्यात नांदेड दौºयावर असताना गोदावरी नदीची पाहणी केली होती़ नांदेड शहरातील १९ नाले थेट गोदावरी नदीत सोडण्यात आल्याचे चित्र या पाहणीत पुढे आले़ याप्रकरणी कारवाईचे आदेश पर्यावरणमंत्र्यांनी दिले होते़ या आदेशानंतर औरंगाबादच्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाºयांनी गोदावरी नदीतील पाण्याचे नमुने घेतले होते़ हे पाणी नमुने दुषित असल्याची बाब स्पष्ट झाल्यानंतर प्रादेशिक अधिकारी जितेंद्र संगेवार यांच्या तक्रारीवरून महापौरांसह आयुक्त आणि एका उपायुक्तांवरही प्रदूषण कायद्यान्वये जिल्हा न्यायालयात फौजदारी गुन्हा दाखल केला आहे़दरम्यान, या प्रकरणात महापौर, आयुक्त आणि उपायुक्तांनी तीन महिन्यांत गोदावरी शुद्धीकरणाचे काम पूर्ण होईल, असे शपथपत्र न्यायालयात दाखल केले आहे़ त्यामुळे पुढील कारवाई थांबविण्यात आली असल्याचे पर्यावरणमंत्री कदम म्हणाले़लाखो भाविकांच्या श्रद्धेचे स्थान असलेल्या गोदावरी नदीच्या शुद्धीकरणाबाबत शिवसेना गंभीर असून या प्रकरणात जबाबदार असलेल्यांविरूद्ध कारवाई होईलच, असेही त्यांनी स्पष्ट केले़