शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

स्वखुशीने करतोय आत्महत्या, कुटुंबाला त्रास झाल्यास पोलिसांनी सुरक्षा द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:02 IST

भराडी : ‘स्वखुशीने आत्महत्या करत असून, माझ्या कुटुंबाला कुठलाही त्रास झाल्यास पोलिसांनी सुरक्षा द्यावी’ अशी चिठ्ठी लिहून भराडी येथील ...

भराडी : ‘स्वखुशीने आत्महत्या करत असून, माझ्या कुटुंबाला कुठलाही त्रास झाल्यास पोलिसांनी सुरक्षा द्यावी’ अशी चिठ्ठी लिहून भराडी येथील भुसार व्यापारी काकासाहेब भिका भागवत (४८) यांनी आपले आयुष्य संपवले. डोईफोडा शिवारातील गट क्रमांक ६१मधील एका झाडाला गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली. या हृद्यद्रावक घटनेने भराडी गावात शोककळा पसरली आहे. काकासाहेब यांच्यावर बॅंकेचे कर्ज असल्यामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असे जवळच्या नातेवाईकांकडून सांगितले जात आहे.

काकासाहेब भिका भागवत यांचा भराडी येथे भुसाराचा व्यवसाय आहे. शुक्रवारी ते नेहमीप्रमाणे दुकानातून घरी आले. कुटुंबियांसोबत जेवण झाल्यानंतर ते रात्री झोपले. सकाळ‌ी घरातील सर्वजण उठल्यानंतर काकासाहेब घरात नसल्याचे दिसले. त्यामुळे मुलगा रोहितने दुकान, गोदामावर जाऊन शोध घेतला, तिथेही ते न आढळल्याने रोहितने शेतात जाऊन पाहिले असता, लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याला वडील दिसले. रोहितने काका पंढरी भागवत यांना ही घटना सांगितली. पोलीस पाटलांसह गावातील लोकांनी घटनास्थळी येत पोलीस पाटलांच्या समक्ष काकासाहेब यांना सिल्लोड उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. सिल्लोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पी. गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार जाधव, संदीप कोथलकर यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. जवळील नातेवाईकांची चौकशी बाकी आहे. सिल्लोड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. शवविच्छेदनानंतर दुपारी साडेबारा वाजता काकासाहेब यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, मुलगा, मुलगी, भाऊ असा परिवार आहे. पुढील तपास बीट जमादार जाधव, संदीप कोथलकर करत आहेत.

खिशात सापडली चिठ्ठी

पोलिसांनी सांगितले की, काकासाहेब भागवत यांच्या खिशात एक चिठ्ठी सापडली आहे. त्यात काकासाहेब यांनी म्हटले आहे की, ‘मी स्वखुशीने आत्महत्या करत असून, माझ्या कुटुंबाला कुठलाही त्रास झाल्यास पोलीस सरंक्षण देतील’ असा उल्लेख करण्यात आला आहे.

खासगी बॅंकेचे कर्ज असल्याची चर्चा

काकासाहेब यांच्यावर खासगी बॅंकेबरोबरच पतसंस्थेचे कर्ज असल्याचे काही नातेवाईकांनी सांगितले. शेतीबरोबरच भुसार मालाचे व्यापारी म्हणून त्यांची गावात ओळ‌ख होती. त्यामुळे कर्जबाजारीपणाला कंटाळूनच काकासाहेब भागवत यांनी आयुष्य संपविण्याचा निर्णय घेतला असावा, असे त्यांच्या नातेवाईकांकडून म्हटले जात आहे.