शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणाधिकारी सोनटक्के यांच्या चौकशीसाठी समिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 00:20 IST

जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्के यांच्या कथित गैरव्यवहारांची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याचा ठराव शुक्रवारी शिक्षण समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला़ शिक्षकांचे समायोजन, अनियमितता व सततच्या अनुपस्थितीवर बोट ठेवत समितीच्या सदस्यांनी शिक्षणाधिकाºयांची चौकशी करण्याचा निर्णय घेतला़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्के यांच्या कथित गैरव्यवहारांची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याचा ठराव शुक्रवारी शिक्षण समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला़ शिक्षकांचे समायोजन, अनियमितता व सततच्या अनुपस्थितीवर बोट ठेवत समितीच्या सदस्यांनी शिक्षणाधिकाºयांची चौकशी करण्याचा निर्णय घेतला़मागील अनेक दिवसांपासून स्थायी समिती, सर्वसाधारण सभा व समितीच्या बैठकीस शिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्के हे गैरहजर राहत आहेत़ शिक्षणाधिकारी कार्यालयातही उपस्थित राहत नसल्याने शिक्षणाधिकारी राहतात तरी कुठे, असा प्रश्न सदस्यांनी उपस्थित केला़ शिक्षकांच्या समायोजनासंदर्भात झालेला गैरव्यवहार काही दिवसांपासून चर्चेत होता़ गतवर्षी अनुदानित प्राथमिक शाळेत २९६ अतिरिक्त शिक्षक ठरले होते़ त्यातील केवळ ५ जणांचे समायोजन झाले़ सेवानिवृत्तीमुळे १५४ शिक्षकांचे त्याच शाळेत रिक्त पदावर समायोजन झाले़अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्नही पुढे आला होता़ अतिरिक्त शिक्षकांना कामावर हजर न करणाºया खाजगी शाळेच्या संस्थाचालकांवर शिक्षणाधिकारी कोणतीच कारवाई करण्यात तयार नव्हते़ न्यायालयीन आदेशाचे पालनही होत नव्हते़ ६६ नियमबाह्य नवीन शिक्षक भरती प्रकरणातही कोणी लक्ष देण्यास तयार नाही़ २ मे २०१२ नंतर भरती झालेल्या काही शिक्षकांना शिक्षणाधिकाºयांनी सेवासातत्य दिले आहे़ अशा विविध विषयासोबत शिक्षण विभागातील गैरव्यवहाराची सातत्याने चर्चा सुरू होती़दरम्यान, आज शिक्षण समितीच्या बैठकीत हे सर्वच विषय समोर आले़ शिक्षण सभापती माधवराव मिसाळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या या बैठकीत सर्व सदस्यांनी शिक्षणाधिकारी सोनटक्के यांची चौकशी करण्याची मागणी केली़ तेव्हा चौकशी समिती स्थापन करण्याच्या ठरावाला सभेने मंजुरी दिली़ यावेळी सदस्य साहेबराव धनगे, व्यंकटराव गोजेगावकर, बबनराव बारसे, अनुराधा पाटील, संध्याताई धोंडगे आदींची उपस्थिती होती़