शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

चौकशीसाठी नेमली समिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 00:26 IST

पाथरी : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत लोणी बु़ येथील शेत रस्त्याच्या कामात झालेला गैरव्यवहार,

लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत लोणी बु़ येथील शेत रस्त्याच्या कामात झालेला गैरव्यवहार, मनरेगा कायद्याचा भंग याविषयी आलेल्या तक्रारीनंतर रोहयो उपजिल्हाधिकारी यांनी गटविकास अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली असून, २० जुलै रोजी या समितीने तपासणीला सुरुवात केली आहे़ पाथरी तालुक्यात मनरेगा अंतर्गत केलेल्या शेत रस्त्याच्या कामांबाबत तक्रारी वाढल्या आहेत़ २०१३-१४ ते २०१६-१७ या काळात ८ कोटी २० लाख रुपये किंमतीची ३५ कामे मंजूर करण्यात आली़ त्यातील ६ कोटी २० लाख रुपयांची कामे सुरू करण्यात आली़ १० कामे पूर्ण झाली तर काही कामे प्रगतीपथावर आहेत़ वाघाळा, बाभळगाव या ठिकाणी ६७ लाख रुपयांच्या निधीतून झालेली तीन कामे करताना लेखासंहितेचा भंग करण्यात आला़ बनावट हजेरी पत्रक तयार करून कामात गैरव्यवहार झाल्याचा प्रकार नुकताच चौकशीमध्ये उघड झाला होता़ हे प्रकरण ताजे असताना लोणी बु़ येथे ४८ लाख रुपयांच्या निधीतून केल्या जाणाऱ्या दोन रस्त्यांच्या कामांमध्ये अनियमिता झाल्याची तक्रार उपजिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल झाली होती़ त्यानंतर लोणी येथे झालेल्या या कामांची चौकशी करण्यासाठी उपजिल्हाधिकारी (रोहयो) सुदर्शन गायकवाड यांनी गटविकास अधिकारी बी़टी़ बायस यांच्या अध्यक्षतेखाली विशेष चौकशी समितीची नियुक्ती केली़ या समितीत बी़टी़ बायस यांच्यासह परभणी येथील सहाय्यक कार्यक्रम अधिकारी सुदाम आवरगंड, तांत्रिक अधिकारी कुणाल मोहिते, मोतीराम शिंदे यांचाही समावेश आहे़ वाघाळी-बाभूळगाव येथील ६७ लाख रुपयांच्या तीन कामांत झालेल्या अनियमितता प्रकरणी चौकशी समितीने उपअभियंता मीनाक्षी मुदीराज, शाखा अभियंता एस़बी़ देवडे यांच्यासह तत्कालीन तहसीलदार, नायब तहसीलदार, सध्या कार्यरत असलेले तहसीलदार वासुदेव शिंदे यांना दोषी ठरवून प्रशासकीय कार्यवाही प्रस्तावित केली आहे़ आता लोणी येथील रस्ता कामातील अनियमितता तपासण्यासाठी चौकशी समिती गावात दाखल झाली असून, चौकशी प्रक्रिया सुरू झाली आहे़