औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न जवळपास चारशे महाविद्यालयांमधून ५ नोव्हेंबरला रंगभूमीदिनी होणाऱ्या इंद्रधनुष्य राज्यस्तरीय युवक महोत्सवासाठी विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. इंद्रधनुष्य युवक महोत्सवासाठी कलावंत विद्यार्थ्यांची निवड दरवर्षी केंद्रीय युवक महोत्सवात उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या संघातून करण्यात येते. मात्र, यावर्षी युवक महोत्सवाच्या काळात निवडणुका असल्याने केंद्रीय युवक महोत्सव पुढे ढकलण्यात आला आहे. हा महोत्सव डिसेंबरमध्ये होणार असून विद्यापीठाने नाटक, संगीत, मिमिक्री, गायन, फोटोग्राफी, रांगोळी इ. प्रकारांसाठी महाविद्यालयातून विद्यार्थ्यांना निवडले आहे. महोत्सवाची तयारी करण्यासाठी एक महिन्याचा कालावधी आहे. अनेक अडचणींना सामोरे जात विद्यार्थी इंद्रधनुष्य पेलण्यास सरसावले आहेत.
‘इंद्रधनुष्या’ची रंगीत तालीम
By admin | Updated: October 12, 2014 00:29 IST