शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
2
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
5
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
6
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
7
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
8
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
9
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
10
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
11
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
12
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
13
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

लेण्यांची सुरक्षा धोक्यात

By admin | Updated: November 14, 2015 00:54 IST

मुजीब देवणीकर , औरंगाबाद जगप्रसिद्ध वेरूळ येथील लेण्या पाहण्यासाठी भारतीयच नव्हे, तर विदेशी पर्यटकही हजारोंच्या संख्येने येतात. मात्र, केंद्रीय पुरातत्व विभाग लेण्यांच्या

मुजीब देवणीकर , औरंगाबादजगप्रसिद्ध वेरूळ येथील लेण्या पाहण्यासाठी भारतीयच नव्हे, तर विदेशी पर्यटकही हजारोंच्या संख्येने येतात. मात्र, केंद्रीय पुरातत्व विभाग लेण्यांच्या सुरक्षेच्या बाबतीत मागील काही वर्षांपासून अक्षम्य दुर्लक्ष करीत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. दोन आठवड्यांपूर्वी लेण्यांच्या पायथ्याशी सिलिंडरचा स्फोट झाला होता, तर आता येथे येणारे पर्यटक रोज लेण्यांमधील मूर्र्तींसोबत छेडछाड करीत असल्याचे समोर आले आहे.भारतीय शिल्पकलेचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून वेरूळ लेण्यांकडे पाहिले जाते. हिंदू, बौद्ध आणि जैन संस्कृतीचे दर्शन घडविणारी शिल्पे या लेण्यांमध्ये आहेत. लेण्यांचे कोरीव काम पर्यटकांना मोहिनी घालणारे आहे. जागतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट असलेल्या वेरूळला देश- विदेशातील लाखो पर्यटक भेट देतात. लेण्यांच्या सुरक्षेचे दायित्व केंद्रीय पुरातत्व विभागाकडे सोपविण्यात आले आहे. दोन आठवड्यांपूर्वी येथील कॅन्टीनमध्ये गॅस सिलिंडरचा स्फोट झाला होता. सुदैवाने या स्फोटामुळे लेण्यांना कोणतेही नुकसान पोहोचले नव्हते.दरम्यान, ‘लोकमत’ने वेरूळ लेण्यांच्या सुरक्षेचा आढावा घेतला असता विदारक चित्र समोर आले. येथे येणारे पर्यटक फोटो सेशनच्या नावाने चक्क मूर्र्तींसोबत छेडछाड करीत असल्याचे निदर्शनास आले. अनेक पर्यटक सेल्फी घेण्याच्या नादात चक्क मूर्र्तींवर जाऊन बसत आहेत. अत्यंत धोकादायक ठिकाणी चढून फोटो काढण्यात पर्यटक मग्न असतात. पर्यटकांना अडविण्यासाठी लेण्यांमध्ये एकही सुरक्षारक्षक नेमलेला नाही. पर्यटक मनात येईल, तेथे चढून फोटो काढत असतात. त्यांच्या या कृतीमुळे जागतिक वारसा लाभलेल्या लेण्यांना हानी पोहोचेल याचे गांभीर्यही राहत नाही.लेण्या पाहण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक पर्यटकासोबत मोबाईल असतोच. अनेक पर्यटक लेण्यांमध्ये मनात येईल, तेथे बसून फोटो काढत आहेत. विदेशी पर्यटक मात्र, अजिबात अशा पद्धतीने फोटो काढत नाहीत. लेण्यांसमोर उभे राहून अत्यंत शिस्तीत ते फोटो काढतात. देशी पर्यटकच मोठ्या संख्येने लेण्यांच्या सुरक्षेला धोका पोहोचवत असल्याचे निदर्शनास आले. यासंदर्भात पुरातत्व विभागाचे अधीक्षक एस.एम. चव्हाण यांच्याशी वारंवार संपर्क साधला असते ते उपलब्ध झाले नाहीत.