शहरं
Join us  
Trending Stories
1
गाझापट्टीत ६० दिवस युद्धविराम; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
2
तीन महिन्यांत ७६७ शेतकरी आत्महत्या; मदत व पुनर्वसन मंत्र्यांची विधान परिषदेत कबुली
3
नाना पटोले अध्यक्षांकडे धावले; राजदंडाला हात लावला, निलंबित
4
पंचतारांकित हॉटेलमध्ये नेऊन विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, प्रतिष्ठित शाळेतील शिक्षिका अटकेत  
5
आजचे राशीभविष्य- २ जुलै २०२५: 'या' राशीतील लोकांनी अवैध कृत्यांपासून दूर राहा, वाणीवर संयम ठेवा
6
मुलींचे लैंगिक शोषण; नराधमांना सोडणार नाही; बीड कोचिंग क्लास प्रकरणात एसआयटी
7
"मी ना तिचा बाप आहे ना बॉयफ्रेंड", फातिमा सना शेखसोबतच्या नात्यावर आमिर खानची प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना फसविले, विमा कंपन्या होणार ब्लॅक लिस्ट; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंची माहिती
9
‘ठाकरे ब्रँड’चे शनिवारी मेळाव्यानिमित्त शक्तिप्रदर्शन; राज-उद्धव वरळी डोममध्ये एकाच व्यासपीठावर
10
‘खरे सुख श्रमाच्या पोटीच जन्म घेते; विसरू नका!’
11
शालार्थ आयडी, ३ महिन्यांत होणार एसआयटी चौकशी, शिक्षणमंत्री दादा भुसेंची माहिती
12
कोण खरे बोलते आहे? आणि कोणाचे दावे झूठ आहेत?
13
विधिमंडळाची ही आचारसंहिता; पण आमदार तसे वागतात का?
14
कुंडमळा पुलाच्या बांधकामात दिरंगाई झाली; सार्वजनिक बांधकाममंत्री भोसले यांची कबुली
15
बाळासाहेब ठाकरे यांचे महापौर बंगल्यातच स्मारक; उच्च न्यायालयाने आव्हान याचिका फेटाळल्या
16
वसई-विरारमध्ये १६ ठिकाणी ईडीची धाड; अनधिकृत इमारती प्रकरणी आर्किटेक्ट, अभियंते रडारवर
17
मराठी सक्तीचीच, पण हिंदीचाही अभिमान, मराठी माणसाला मुंबईतून कोणी घालविले : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल
18
डेटिंगवरून वाद विकोपाला, मुलीने जीव गमावला; सीसीटीव्ही, साक्षीदारांमुळे तपासाला दिशा
19
टायर-ट्यूबमधून जीवघेणा प्रवास, जव्हार तालुक्यातील प्रकार : पूल तर नाहीच, पण होडीसुद्धा उपलब्ध नाही
20
जहाजाच्या पुढील प्रवासाला ना हरकत देण्यासाठी लाचखोरी ; पोर्ट विभागाच्या ३ कॅप्टनसह दोघे सीबीआयच्या जाळ्यात

आचारसंहिता संपताच बदली प्रक्रिया

By admin | Updated: May 10, 2014 23:50 IST

बीड : मे महिन्यास सुरुवात होताच जिल्हा परिषदेत बदल्यांचे वारे वाहू लागले आहे़ लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपताच १७ मेपासून बदल्यांच्या प्रक्रियेस सुरुवात होणार आहे़

 बीड : मे महिन्यास सुरुवात होताच जिल्हा परिषदेत बदल्यांचे वारे वाहू लागले आहे़ लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपताच १७ मेपासून बदल्यांच्या प्रक्रियेस सुरुवात होणार आहे़ दरम्यान, गतवर्षी जिल्हा परिषदेत बदली घोटाळा गाजला होता़ यावेळी त्याची पुनरावृत्ती होऊ न देण्याचे आव्हान कायम आहे़ जिल्हा परिषदेतील बदल्या व पदोन्नत्यांचा घोटाळा गतवर्षी ‘लोकमत’ने चव्हाट्यावर आणला होता़ त्यानंतर आयुक्तांनी त्याची गंभीर दखल घेऊन दोन स्वतंत्र समित्यांमार्फत चौकशी केली होती़ बदल्यांच्या प्रक्रियेत अनियमितता केल्याचा ठपका ठेवून चार कर्मचार्‍यांवर निलंबनाची कारवाईही झाली होती़ बदल्यांतील अनियमिततेचे प्रकरण वर्षभर सतत चर्चेत राहिले़ अशातच आता मे महिना उजाडताच पुन्हा एकदा कर्मचार्‍यांना बदल्यांची चाहूल लागली आहे़ लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपताच जिल्हा परिषदेत बदल्यांची प्रक्रिया आॅनलाईन पद्धतीने राबविण्यात येणार आहे़ १० टक्के प्रशासकीय तर १० टक्के विनंती बदल्या होणार आहेत़ त्यासाठी विभागप्रमुखांकडून माहितीही मागविली आहे़ त्यानुसार विभागप्रमुख सध्या याद्या बनविण्याच्या तयारीत व्यस्त आहेत़ माहिती तातडीने सामान्य प्रशासन विभागाकडे पोहंचविण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. महिला व अपंग कर्मचार्‍यांना प्राधान्य बदल्यांच्या संचिका रितसर सामान्य प्रशासन विभागातून पुढे जातील़ कुठल्याही उणिवा राहणार नाहीत, याची दक्षता घेतली जाईल़ महिला व अपंग कर्मचार्‍यांना प्राधान्य देण्यात यईल़ कोणावरही अन्याय होणार नाही यादृष्टीने प्रयत्न असल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) आऱ आऱ भारती यांनी सांगितले. (प्रतिनिधी) पारदर्शकता ठेवू मागच्यावेळी काही प्रमाणात चुका झाल्या मात्र, यावेळी असे होणार नाही़ आॅनलाईन पद्धतीने बदल्यांची प्रक्रिया राबविण्यात येईल़ प्रशासकीय व विनंती बदल्यांची प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यावर भर दिला जाणार आहे़ बदल्यांमध्ये अनियमितता करणार्‍या कर्मचार्‍यांची गय केली जाणार नाही़ आर्थिक व्यवहार करु नयेत़ तसे काही आढळले तर तडकाफडकी निलंबन करण्यात येईल, असा इशारा सीईओ राजीव जवळेकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिला़