शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

सोयगावात कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 01:14 IST

सोयगाव/बनोटी : तालुक्यातील हनुमंतखेडा येथील सीमा राठोड या विद्यार्थिनीच्या खूनप्रकरणी सोमवारी सोयगाव शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कसोयगाव/बनोटी : तालुक्यातील हनुमंतखेडा येथील सीमा राठोड या विद्यार्थिनीच्या खूनप्रकरणी सोमवारी सोयगाव शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. गोरसेना शाखेच्या वतीने मूकमोर्चा काढून निषेध करण्यात आला व सीमाला न्याय मिळवून देण्याची मागणी करण्यात आली.सीमा रामदास राठोड (१६) ही शुक्रवारी (दि. १४) पिण्याचे पाणी आणण्यासाठी गावाबाहेरील विहिरीवर गेली असता, तिचे अज्ञात आरोपींनी अपहरण करून खून केला व मृतदेह घाटनांद्रा घाटात फेकून दिला होता. ही घटना उघडकीस आल्याने सर्वत्र खळबळ उडाली. याप्रकरणी सोमवारी सोयगाव बंदची हाक दिल्याने या बंदमध्ये सर्वांनीच सहभाग घेतल्याने पोलिसांनी मोठा धसका घेतला. शहरात मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. शिवाजी चौकातून शिस्तीत निघालेला मूकमोर्चा सोयगाव पोलीस ठाण्यावर धडकला. या ठिकाणी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप वैराळे, नीरज राजगुरू यांना निवेदन देण्यात येऊन माघारी फिरलेल्या मोर्चेकऱ्यांनी शिवाजी चौकात प्रशासनाचा निषेध करुन मोर्चा तहसील कार्यालयाकडे वळविला. सोयगावच्या तहसीलदार छाया पवार यांना मागणीचे निवेदन देण्यात आले. शहरातील मुख्य चौकात दंगाकाबू पथकाचे जवान, दरोडा प्रतिबंधक पथक, सिल्लोड, अजिंठा, फुलंब्री येथील पोलीस पथके तैनात करण्यात आली होती.मूकमोर्चातील प्रमुख मागण्यासंबंधित घटनेचा तपास गुप्तचर विभागाकडे सोपवावा, पीडित अल्पवयीन मुलीवर अपहरणासोबतच सामूहिक अत्याचार झाला असून पोलिसांनी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप निवेदनात नमूद केला आहे. त्यामुळे याची गांभीर्याने दखल घेण्यात यावी, अन्यथा राज्यभर आंदोलन करण्यात येईल, असे गोरसेनेच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. सोमवारी हनुमंतखेडा गावात जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक पोलीस पथके तपासासाठी गावाच्या आजूबाजूला फिरत होती. पोलिसांच्या संशयाची सुई स्थानिक असल्याची शक्यता दिसून आल्याने हनुमंतखेड्याला छावणीचे स्वरूप आले होते. सीमारेषेवर असलेल्या जळगाव पोलिसांनाही घटनेवर लक्ष देण्याच्या सूचना प्राप्त झाल्याने तेही या भागाच्या संपर्कात आहेत.