शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

घट्ट मैत्रीला लागली काळाची दृष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 00:25 IST

मुंबईत मराठा मोर्चात सामील झाल्यानंतर घरी परतणाºया समाजबांधवाच्या कारला झालेल्या अपघातात वाळूज महानगरातील दोन तरुणाचा मृत्यू झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाळूज महानगर : मुंबईत मराठा मोर्चात सामील झाल्यानंतर घरी परतणाºया समाजबांधवाच्या कारला झालेल्या अपघातात वाळूज महानगरातील दोन तरुणाचा मृत्यू झाला. या अपघातात अन्य दोघे गंभीर जखमी झाले. तिसरा मृत तरुण हा अहमदनगर जिल्ह्यातील आहे. बजाजनगरातील मृत तरुण अविनाश गव्हाणे यांच्या पार्थिवावर बजाजनगरात आणि नारायण थोरात याच्या पार्थिवावर गाजगाव येथे गुरुवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत अविनाशचा विवाह २५ नोव्हेंबरला ठरला होता. मात्र त्यापूर्वीच काळाने त्यांच्यावर झडप घातल्यामुळे बजाजनगरात हळहळ व्यक्त होत आहे.मुंबईहून नाशिकमार्गे औरंगाबादकडे येत असताना येवला तालुक्यातील खामगाव पाटी येथे ट्रक, मारुती कार व व्हर्ना कार या तिहेरी अपघातात अविनाश गव्हाणे, नारायण थोरात, हर्षल घोलप या तिघांचा मृत्यू झाला. तर गौरव प्रजापती व उमेश भगत हे दोघे गंभीर जखमी झाले. जखमींवर शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. या अपघाताची माहिती मिळताच बजाजनगरातील या तरुणाचे नातेवाईक व शेकडो कार्यकर्ते घटनास्थळाकडे रवाना झाले होते. या भीषण अपघाताची माहिती मिळताच वाळूज महानगरात शोककळा पसरली. सोशल मीडियामधून या अपघाताच्या माहितीची दिवसभर देवाण-घेवाण सुरू होती.मराठा मोर्चाला उपस्थित राहण्यासाठी वाळूज महानगर परिसरातील अविनाश गव्हाणे (२२, रा. बजाजनगर), नारायण थोरात (रा. गाजगाव), गौरव प्रजापती व उमेश भगत (दोघेही रा. सिडको वाळूज महानगर) असे चौघे जण कारने (क्र. एमएच-२०, ईएफ- ७२६४) बजाजनगरातून अहमदनगरमार्गे मुंबईकडे निघाले होते. या चौघांचा मित्र हर्षल घोलप (रा. संगमनेर) याला त्यांनी पुण्यातून सोबत घेतले होते.लग्नापूर्वीच काळाने घातला घालामृत अविनाश नवनाथ गव्हाणे (२२) याचे कुटुंब मूळचे वेलतुरी (ता.आष्टी जि.बीड) येथील रहिवासी असून, गव्हाणे कुटुंब २५ वर्षांपूर्वी बजाजनगरात आले होते. अविनाशचे आई-वडील बजाजनगरात किराणा दुकान चालवतात. तर अविनाश याने पुणे येथील डी. वाय. महाविद्यालयात अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे. आई-वडिलांना एकुलता एक असलेल्या अविनाशने काही दिवसांपूर्वी मोबाईल कंपनीची डीलरशिप घेतली होती. दोन महिन्यांपूर्वीच अविनाशचा साखरपुडा शेवगाव तालुक्यातील शिकारे नांदूर गावातील तरुणीशी थाटामाटात पार पडला होता. २५ नोव्हेंबर ही विवाहाची तारीख निश्चित करण्यात आली होती. मात्र त्यापूर्वीच अविनाशवर काळाने घाला घातल्यामुळे त्यांच्या कुटुंबियावर दु:खाचा डोंगर कोसळला.