शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

ऊर्जा विभागाच्या १७ योजना बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2017 00:23 IST

गेल्या तीन वर्षांपासून ऊर्जा विभागाशी संबंधित १७ योजनांसाठी एकाही रुपयाची तरतूद केली गेली नसल्याने या योजना बंद करण्याचा निर्णय राज्य शासनाने नीती आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार घेतला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : गेल्या तीन वर्षांपासून ऊर्जा विभागाशी संबंधित १७ योजनांसाठी एकाही रुपयाची तरतूद केली गेली नसल्याने या योजना बंद करण्याचा निर्णय राज्य शासनाने नीती आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार घेतला आहे.नियोजन विभागाच्या माहिती प्रणालीवरील आधीनस्थ असलेल्या ऊर्जा विभागाच्या दोन व महाऊर्जा विभागाच्या १७ योजना या केंद्र शासन पुरस्कृत असल्याने त्यांना केंद्राकडून परस्पर निधी मिळत होता. त्यामुळे राज्य शासनाने या १७ योजनांसाठी गेल्या तीन वर्षात एक रुपयाच्याही निधीची तरतूद केली नाही. त्यामध्ये राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजना, कृषीजन्य अवशेषांवर आधारित वीज निर्मितीसाठी महाऊर्जा विकास अभिकरण सहायक अनुदान, सौरऊर्जा प्रकल्पासाठी महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणास सहायक अनुदान, वीज पार्क कार्यक्रमासाठी सहायक अनुदान, नवीन सौर शहरासाठी सहायक अनुदान, ग्रामीण विद्युतीकरणासाठी सहाय्यक अनुदान, ग्रामीण वीज सुरक्षा कार्यक्रमासाठी सहाय्यक अनुदान, अपारंपारिक ऊर्जा कार्यक्रमाच्या प्रचार, प्रसिद्धी व प्रदर्शनासाठी सहायक अनुदान, सौर कंदील कार्यक्रमासाठी सहायक अनुदान, बॅटरीवर आधारित वाहन कार्यक्रमासाठी सहाय्यक अनुदान, पवन संकरित यंत्राच्या कार्यक्रमासाठी सहाय्यक अनुदान, सौर औष्णिक कार्यक्रमासाठी सहायक अनुदान, सौर प्रशासकीय कार्यक्रमासाठी अनुदान, वारा परिमापन केंद्र स्थापन्यासाठी अनुदान, जलविद्युत प्रकल्पासाठी सहायक अनुदान, अक्षय ऊर्जा कार्यक्रमासाठी सहायक अनुदान व सुधारित गतिमान विद्युत विकास कार्यक्रमांतर्गत महावितरण कंपनीस कर्ज या योजनांचा समावेश आहे.या योजनांकरिता गेल्या तीन वर्षात एक रुपयाचीही तरतूद केली गेली नसल्याने या योजनाच बंद करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या संदर्भातील आदेश २१ सप्टेंबर रोजी काढण्यात आले आहेत.