शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
2
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
3
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
4
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
5
Prada :"नियमबाह्य नक्कल करणाऱ्या कंपन्यांना सरकारनेही...", प्राडा कंपनीविरोधात संभाजीराजेंची पोस्ट
6
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
7
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
8
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
9
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
10
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
11
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
12
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
13
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
14
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
15
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
16
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
17
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
18
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
19
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
20
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत

सहकारमंत्र्यांच्या ‘लोकमंगल’ला क्लिनचिट

By admin | Updated: December 29, 2016 23:59 IST

उस्मानाबाद : पालिका निवडणूक कालावधीत स्थिर पथकाने उमरगा चौरस्ता येथे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या ‘लोकमंगल मल्टीस्टेट’ची ९१ लाख ५० हजारांची रक्कम जप्त केली होती.

उस्मानाबाद : पालिका निवडणूक कालावधीत स्थिर पथकाने उमरगा चौरस्ता येथे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या ‘लोकमंगल मल्टीस्टेट’ची ९१ लाख ५० हजारांची रक्कम जप्त केली होती. या प्रकरणी आयकर विभागाने जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर केला असून, या अहवालात लोकमंगलला क्लिनचिट दिल्याने जप्त केलेली रक्कम परत देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक विभागाच्या स्थिर पथकाकडून १६ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेबारा ते एक वाजेच्या दरम्यान उमरगा चौरस्ता येथे सोलापूरहून उमरग्याकडे येणाऱ्या व दर्शनी भागात ‘लोकमंगल’चे चिन्ह असलेल्या जीप (क्र. एमएच १३/ बीएन ८६५६) मध्ये ९१ लाख ५० हजारांची रोकड मिळून आली होती. या रकमेबाबत पथकाने जीपचालक व जीपमधील अन्य एका व्यक्तीकडे चौकशी केल्यानंतर ही रक्कम लोकमंगल बँकेच्या इतर शाखांमधून आणली असून, उमरगा येथील लोकमंगल पतसंस्थेचे पैसे घेऊन जाण्यासाठी इकडे आल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, ठोस उत्तरे न मिळाल्याने सदरील पथकाने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून ही रक्कम वाहनासह पोलिस ठाण्यात जमा केली. ही रक्कम जिल्हा कोषागारात जमा करण्यात आली होती. या एकूणच प्रकरणाची चौकशी आयकर विभागाकडून झाल्यानंतर विभागाने जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर केला असून, यात लोकमंगलला क्लिनचिट दिल्याचे स्पष्ट होते.