उस्मानाबाद : मागील भांडणाची कुरापत काढून आपापसात हाणामारी करणाऱ्या ११ जणाविरूध्द शुक्रवारी नळदुर्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ही घटना गुरूवारी रात्री गंधोरा (ता़तुळजापूर) येथे घडली़याबाबत पोलिसांनी सांगितले की, गंधोरा येथील एका ६५ वर्षीय वृध्द महिलेसह तिच्या मुलास गावातीलच तिघांनी मिळून गुरूवारी रात्री सकाळच्या भांडणाचा राग मनात धरून लाथाबुक्क्याने, दगडाने मारहाण करून जखमी केले़ याबाबत जखमी वृध्द महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून तिघाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तर दुसऱ्या गटातील एका इसमाने दिलेल्या फिर्यादीनुसार, गंधोरा येथील सात जणांनी संगणमत करून मागील भांडणाची कुरापत काढत एका इसमास व त्याच्या आई-वडिलांना काठीने जबर मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली़ या प्रकरणी जखमी इसमाने दिलेल्या फिर्यादीवरून वरील ११ जणाविरूध्द नळदुर्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ सदरील घटनेचा तपास पोहेकॉ भोसले हे करीत आहेत़ (प्रतिनिधी)
गंधोरा येथे दोन गटांत हाणामारी
By admin | Updated: December 21, 2014 00:08 IST