शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

ज्वारी काढण्यावरून दोन गटांत हाणामारी

By admin | Updated: March 2, 2015 00:52 IST

नळदुर्ग : कुळाच्या शेतातील ज्वारी काढण्यावरून दोन गटांत तलवार, कोयत्याने तुंबळ हाणामारी झाल्याची घटना शनिवारी दुपारी २ वाजता तुळजापूर तालुक्यातील देवसिंगा नळ येथे घडली.

नळदुर्ग : कुळाच्या शेतातील ज्वारी काढण्यावरून दोन गटांत तलवार, कोयत्याने तुंबळ हाणामारी झाल्याची घटना शनिवारी दुपारी २ वाजता तुळजापूर तालुक्यातील देवसिंगा नळ येथे घडली. या घटनेत नऊजण जखमी झाले असून, परस्पर तक्रारीवरून २५ जणांवर गुन्हा नोंद झाला आहे. श्रीशैल गणपती बिराजदार यांनी नळदुर्ग पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, देवसिंगा (नळ) येथील सर्वे नंबर ६३ मधील जमिनीवर त्यांचे कूळ असून, सदर प्रकरणी न्यायालयात दावा चालू आहे. असे असताना सैफन शेख, अजरोद्दीन शेख, अब्दुल शेख (सर्व रा. देवसिंगा नळ) तसेच हसन पठाण, चाँद पठाण, इरलाल पठाण, महंमद पठाण (सर्व रा. धोत्री, ता. द. सोलापूर), इब्राहिम जमादार (रा. आलूर), अब्बासअली शेख (रा. बेंबळी) यांनी संगनमताने फिर्यादी व पंडित बिराजदार, भीमराव बिराजदार व धोंडीराम बिराजदार यांना काठ्या व दगडाने मारहाण केली. यावरून गुन्हा नोंद झाला आहे. दरम्यान, हसन नादर पठाण (रा. धोत्री) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, सदर जमिनीवर मागच्या अनेक वर्षापासून माझा ताबा असून, न्यायालयाने त्याच्यासारखा निकाल दिला आहे. शिवाय सातबारावर माझेच नाव आहे. कूळसंबंधी तक्रार चालू असली तरी गणपत बिराजदार, विनोद बिराजदार, आप्पासाहेब जेऊरे, युवराज बिराजदार, आनंदप्पा बिराजदार, सोमनाथ बिराजदार, विकास बिराजदार, श्रीशैल बिराजदार, धर्मराज बिराजदार, धोंडप्पा बिराजदार, संदेश बिराजदार, पंडित बिराजदार, भीमराव बिराजदार, संगप्पा बिराजदार (रा. सर्व देवसिंगा नळ) यांनी संगनमताने तलवार, कोयता, कुऱ्हाडी, दगड व काठ्याने जिवे मारण्याच्या उद्देशाने मारहाण केली. यात हाजमुद्दीन पठाण याच्या डोक्यावर व कपाळावर तलवारीचे वार झाले असून, महंमद पठाण, आसीफ पठाण, अबीदा पठाण, बंदेअली शेख जखमी झाले आहेत. जखमींना सोलापूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तपास पोउपनि पठाण व दिलीप सरवदे करीत आहेत. घटनास्थळास सपोनि एम. वाय. डांगे, उपविभागीय पोलीस अधिकारी विधाते यांनी भेट दिली असून, रविवारी सायंकाळपर्यंत धरपकड चालूच होती. (वार्ताहर)