शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
2
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
3
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
4
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
5
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
6
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
7
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
8
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
9
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
10
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
11
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
12
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
13
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
14
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
15
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
16
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
17
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
18
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
19
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
20
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छतेच्या वारक-यांनी केले शहर स्वच्छ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 00:35 IST

राज्याच्या पर्यटन राजधानीतील ४२ ठिकाणे स्वच्छतेच्या वारक-यांनी शुक्रवारी स्वच्छ केली. सकाळी ६ ते १० वाजेपर्यंत शहरात स्वच्छतेचे महाअभियान राबविण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : राज्याच्या पर्यटन राजधानीतील ४२ ठिकाणे स्वच्छतेच्या वारक-यांनी शुक्रवारी स्वच्छ केली. सकाळी ६ ते १० वाजेपर्यंत शहरात स्वच्छतेचे महाअभियान राबविण्यात आले. या अभियानात शासकीय कर्मचा-यांसह शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मोठा सहभागनोंदविला.पर्यटन स्थळांचा वारसा, संस्कृतीचे जतन करण्यासाठी स्वच्छतेला मोलाचे स्थान आहे. परिसर व आस्थापना कार्यालय स्वच्छ ठेवण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा. पर्यटन राजधानीला स्वच्छ सुंदर बनविण्याचे आवाहन विभागीय आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर यांनी केले. शहागंज येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या अभियानाला सुरुवात झाली. शहागंज चौक येथून सिटी चौक, रंगारगल्ली मार्गे गुलमंडी या परिसरात विभागीय आयुक्तांनी सहभाग घेत स्वच्छतेबाबत प्रबोधनही केले.डॉ. भापकर म्हणाले, पंतप्रधानांनी ‘स्वच्छता ही सेवा’ हा नारा दिला. राष्ट्रीय सेवा योजना, स्काऊट गाईड, महाविद्यालयीन, शालेय विद्यार्थी, नागरिक आणि शासनाच्या विविध कार्यालयांतील अधिकारी, कर्मचाºयांनी या स्वच्छता अभियानात सहभाग घेऊन श्रमदान केले. ज्या भागात श्रमदान केले तो भाग सहभागी झालेल्यांना दत्तक देऊन दर महिन्याला जनजागृतीच्या दृष्टिकोनातून मोहीम राबविण्यात येणार असल्याचे डॉ. भापकर यांनी सांगितले. ५ ते २५ आॅक्टोबरदरम्यान पर्यटन पर्व राबविण्यात येत असून, या पर्वाची सुरुवात स्वच्छता अभियानापासून झाली आहे. पुढील टप्प्यात उर्वरित ऐतिहासिक, पर्यटनस्थळांची स्वच्छता करण्यात येणार आहे. आजच्या मोहिमेत जवळपास लाखभर नागरिक, युवक-युवती, अधिकारी-कर्मचाºयांनी ४२ ठिकाणी स्वच्छता मोहिमेत श्रमदान केले. त्यांचे भापकर यांनी आभार मानले. या अभियानाचा समारोप गुलमंडी परिसरात झाला.यावेळी उपायुक्त वर्षा ठाकूर, महेंद्र हरपाळकर, पारस बोथरा, अप्पर जिल्हाधिकारी पी.एल. सोरमारे, माहिती संचालक देवेंद्र भुजबळ, पर्यटन विभागाचे व्यवस्थापक अण्णासाहेब शिंदे, वनाधिकारी वडस्कर यांच्यासह हिंदी विद्यालय, समाजकार्य महाविद्यालय, मराठा हायस्कूल, गुजराती विद्यालय, स्काऊट गाईडस्, शासकीय ज्ञान-विज्ञान महाविद्यालयाचे विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी यांची उपस्थिती होती.