शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

सिटी बसची सेवा कोलमडली !

By admin | Updated: January 4, 2016 00:05 IST

आशपाक पठाण , लातूर लातूर महापालिकेने सुरू केलेली परिवहन सेवा कोलमडली असून केवळ एकाच मार्गावर वाहतूक सुरू आहे़ अत्यंत थाटामाटात सुरू झालेली ही सेवा

आशपाक पठाण , लातूरलातूर महापालिकेने सुरू केलेली परिवहन सेवा कोलमडली असून केवळ एकाच मार्गावर वाहतूक सुरू आहे़ अत्यंत थाटामाटात सुरू झालेली ही सेवा कमी बसेसमुळे प्रवाशांच्या सोयीऐवजी आता गैरसोयीची ठरत आहे़ गंजगोलाई ते बार्शी रोड याच मार्गावर सिटी बस सुरू आहे़ इतर मार्गावरील बस गेल्या महिनाभरापासून बंद झाल्याने प्रवाशांमध्ये नाराजी वाढली आहे़केंद्र शासनाच्या जेएनएनयुआरएम योजनेंतर्गत लातूर महापालिकेला बसेस मंजूर झाल्या़ केंद्राकडून निधी प्राप्त होण्याअगोदरच महापालिकेने स्वत: तीन बसेस खरेदी केल्या़ लोकनेते विलासराव देशमुख यांच्या जयंतीचे औचित्य साधून परिवहन सेवेला प्रारंभ झाला़ संपूर्ण शहरात बसेस धावणार असल्याने मनपाने नियोजनही केले़ मात्र, केंद्र शासनाने जेएनएनयुआरम योजनेलाच पूर्णविराम दिल्याने लातूरच्या परिवहन सेवेला ग्रहण लागले़ केंद्र शासनाकडून निधी मिळणार नसल्याचे संकेत मिळाल्यावर परिवहन विभागाने महापालिकेकडूनच सेवा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला़ त्यानुसार नवीन ८ बसेस खरेदी करण्याचा निर्णयही झाला़ परंतू अद्याप बसेसची खरेदीच झाली नसल्याने शहराच्या एकाच मार्गावर परिवहन सेवा सुरू असल्याने इतर मार्गावरील प्रवाशांना मात्र खाजगी आॅटोरिक्षांशिवाय पर्याय नाही़ गंजगोलाई ते राजीव गांधी चौक, १२ नं़ पाटी, अंबाजोगाई रोडवरील मेडिकल कॉलेज, नांदेड रोडवरील कोळप्यापर्यंत सिटी बस सेवा सुरू झाली़ कमी दरात प्रवाशांना सेवा मिळत असल्याने प्रारंभी प्रतिसादही चांगला मिळाला, मात्र, बस येण्याची वेळच नक्की नसल्याने प्रतिसाद कमी होत गेला़ दरम्यान, प्रवाशांचा प्रतिसाद मिळत नसल्याचे कारण पुढे करून एकाच मार्गावर तीन बसेस धावत आहेत़ (प्रतिनिधी)