शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

सीताफळ बाजारपेठ दलालांच्या विळख्यात

By admin | Updated: October 23, 2014 00:16 IST

अविनाश मुडेगावकर , अंबाजोगाई डोंगर परिसरात पिकणाऱ्या पण मोठ्या शहरात मोठी मागणी असलेले सीताफळ या फळाची बाजारपेठ अंबाजोगाईत मोठ्या प्रमाणात फुलली असून अंबाजोगाई शहरासह बाहेर गावाहून

अविनाश मुडेगावकर , अंबाजोगाईडोंगर परिसरात पिकणाऱ्या पण मोठ्या शहरात मोठी मागणी असलेले सीताफळ या फळाची बाजारपेठ अंबाजोगाईत मोठ्या प्रमाणात फुलली असून अंबाजोगाई शहरासह बाहेर गावाहून येणाऱ्या पर्यटकांची सिताफळ खरेदीसाठी मोठी झुंबड उडत आहे. मात्र, सामान्य ग्राहकांपेक्षा सीताफळ खरेदी करणाऱ्या दलालांची संख्या मोठ्या प्रमाणात झाल्याने विक्रीसाठी आणणाऱ्या शेतकऱ्यांना या दलालांच्या विळख्यात अडकावे लागत आहे. अंबाजोगाई शहर व परिसरात असणाऱ्या बालाघाटाच्या डोंगरपट्ट्यात असलेल्या डोंगरदऱ्यात मोठ्या प्रमाणात सिताफळाची झाडे आहेत. तसेच येल्डा, चिचखंडी, कुरणवाडी, काळवटी तांडा, या परिसरात सीताफळांची झाडे मोठ्या प्रमाणात आहेत. दसरा ते दिवाळीच्या कालावधीत सीताफळाचा मोठा बहर असतो. या परिसरातील ग्रामस्थांना दिवाळीचा सण साजरा करण्यासाठी सिताफळाच्या विक्रीतून उपलब्धी प्राप्त होते. डोंगर कपारीत जाऊन आपल्या कुटुंबासह सीताफळ गोळा करायची व ती अंबाजोगाईत आणून विकायची. या कामावरच या परिसरातील अनेकांचा उदरनिर्वाह चालतो. सकाळी सात वाजल्यापासूनच सीताफळांच्या डाला योगेश्वरी मंदिराच्या परिसरात विक्रीसाठी येतात. बाहेरगावाहून योगेश्वरी देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची सीताफळ खरेदीसाठी मोठी गर्दी होते. सीताफळाची एक डाल किमान दोनशे ते तीनशे रुपयांपर्यत विक्री होते. सकाळी दहापर्यंत ही विक्री करून शेतकरी आपल्या गावी निघून जातात. केवळ जोडधंदा म्हणून व्यवसाय करणाऱ्या या शेतकरी व शेतमजुरांची मात्र आता या क्षेत्रात दलालांनी शिरकाव केल्याने उपेक्षा होऊ लागली आहे.अंबाजोगाईत सकाळी सीताफळे विक्रीसाठी येताच येथे टेम्पो लावून सीताफळे खरेदी केली जातात व मुंबई, पुणे अशा मोठ्या शहरात नेऊन या सीताफळांची पाच ते दहा पट जादा भावाने विक्री केली जाते. परिणामी डोंगर कपारीत दिवसभर वणवण करीत सीताफळे गोळा करणाऱ्या मजुरांपेक्षा दलालांचेच फावते आहे. अंबाजोगाईत सीताफळ संशोधन केंद्र सरकारने स्थापन केले. मात्र, या सीताफळांना शीतगृह अथवा माल साठविण्यासाठी कसल्याही सुविधा उपलब्ध झाल्याने दलालांचं चांगभलं, अशी अवस्था झाली आहे. इतर धान्य व फळांबरोबरच रानमेवा असलेल्या सीताफळ फळांवरही दलालांचे अतिक्रमण झाल्याने या परिसरातील शेतकरी व मजुरांची मोठी उपेक्षा होऊ लागल्याचे चित्र अंबाजोगाई तालुक्यात दिसून येत आहे.