शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी सातारा-देवळाईतील नागरिक जलआंदोलनाच्या तयारीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 00:12 IST

सातारा-देवळाईतील जुन्या जलस्रोतावर लाखोंची तहान भागत नाही, नाइलाजास्तव खाजगी टँकरच्या पाण्यावर परिसर तगतो आहे

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : सातारा-देवळाईतील जुन्या जलस्रोतावर लाखोंची तहान भागत नाही, नाइलाजास्तव खाजगी टँकरच्या पाण्यावर परिसर तगतो आहे. यंदा पावसाळ्यात बोअरवेलची पातळी खालावली आहे. त्यामुळे उन्हाळ्यात पाण्याचे संकट गडद झाल्याने जनआंदोलनासाठी नागरिक एकवटले आहेत.महानगरपालिकेत येण्यासाठी नागरिकांना पाणी, रस्ते, लाइट, ड्रेनेज या चार सुविधांचे गाजर दाखविण्यात आले होते. ग्रामपंचायतीच्या काळात स्थानिक जलस्रोत आटले की, सरकारी यंत्रणा टँकरद्वारे पाणीपुरवठा करून नागरिकांची तहान भागवत होती; परंतु आता पाणी...पाणी म्हणत नागरिकांचा घसा कोरडा पडला आहे. पूर्वी ग्रामपंचायतीच्या काळात पाण्यासाठी नागरिकांचा सततचा संघर्ष सुरू होता, तर आज महानगरपालिकेत आल्यावर तो पुन्हा बळावला आहे. मनपाने टँकर पुरवठ्याच्या पाण्यावर लावलेला खर्च अन् टँकरच्या फेºयातही तफावत जाणवत आहे. त्यामुळे नागरिकांना जारचे पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे.सातारा-देवळाईत इतर जलस्रोतावरून पाणी लिफ्टिंग करून आणणे जेवढे जिकरीचे आहे, त्यापेक्षाही मनपाच्या जलवाहिनीला सातारा-देवळाई जोडणे सोयीचे ठरणार आहे. जलकुंभ उभारून जनतेला जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा करावा, अशी नागरिकांची मागणी आहे. टँकरच्या पाण्यावर जनतेची तहान भागत नाही. ३० दिवसांचे पैसे भरून घेतात अन् त्या तुलनेत किती ड्रम आणि किती दिवस पाणीपुरवठा करता, असा सवालही नागरिकांनी उपस्थित केला आहे.गावाची भौगोलिक अवस्था पाहता येथील नागरिकांना शासकीय मदत मिळण्यास खूप विलंब लागतो, डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या परदरी तलावातील पाणीसाठा या वर्षात थोडाफार वाढला आहे. त्या पाण्यातून स्थानिक नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघू शकतो; परंतु उगाचच आमच्या तोंडचे पाणी पळवून तुमचाही घसा कोरडा आणि गावातील नागरिकांची पाण्यासाठी भटकंती होईल. त्यामुळे ग्रामपंचायतीने पाणी पाहणीसाठी गेलेल्या मनपाच्या पथकालादेखील विरोध केला आणि पुढेही तो कायम असल्याची भूमिका नागरिकांनी घेतली आहे.गावातून सातारा-देवळाईपर्यंत पाणी मनपाने जायकवाडीच्या जलवाहिनीतूनच द्यावे, अशी भूमिका सातारा-देवळाईच्या नागरिकांनी घेतली आहे. त्यामुळे पाणी प्रश्नावर नागरिकांचे जलआंदोलन उभे राहत आहे.