शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

‘स्ट्रीटस्‌ फॉर पीपल’ कार्यक्रमास नागरिकांचा प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:28 IST

औरंगाबाद : केंद्र सरकारच्या ‘स्ट्रीटस्‌ फॉर पीपल’ या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेचा दुसरा कार्यक्रम रविवारी क्रांतीचौक येथे पार पडला. कलाकारांनी ...

औरंगाबाद : केंद्र सरकारच्या ‘स्ट्रीटस्‌ फॉर पीपल’ या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेचा दुसरा कार्यक्रम रविवारी क्रांतीचौक येथे पार पडला. कलाकारांनी आपल्या विविध कलाकृतींचे सादरीकरण करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. स्वयंसेवी संस्था, क्रीडा संघटना, रॉक बँड स्वयंसेवकांनी यात सहभाग नोंदवून वातावरण निर्मिती केली.

औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉपोर्रेशन लिमिटेड (एएससीडीसीएल) आणि औरंगाबाद महानगरपालिकेने राष्ट्रीय स्तरावरील ‘स्ट्रीटस्‌ फॉर पीपल’ स्पर्धेत सहभाग नोंदवून औरंगाबादच्या रस्त्यांचा विकास करण्याचे नियोजन केले आहे. क्रांतीचौकात झालेल्या कार्यक्रमाचे उद्घाटन पोलीस आयुक्त निखिल गुप्ता, मनपा प्रशासक तथा एएससीडीसीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, शालिनी गुप्ता यांच्या हस्ते झाले.

स्पर्धेच्या निमित्ताने क्रांतीचौक ते गोपाळ टी चौकापर्यंतचा रस्ता रहदारीमुक्त करण्यात आला होता. नितीन घोरपडे यांनी कार्यक्रमाची आखणी केली़ रोलर रिले स्केटिंग असोसिएशनचे भिकन आंबे यांच्या मार्गदर्शनाखाली स्केटिंग व सायकल स्टंटचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले. गोल्डी चंद्रशेखर यांच्या चमूचा समावेश असलेल्या एनओबी बॅण्ड यांनी संगीत, तर सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ व किशोरी विकास प्रकल्पाच्या चमूने रस्ते सुरक्षा, सेल्फ डिफेन्स, हुंडाबळी, व्यसनमुक्तीवर पथनाट्य सादर केले. सतीश दिवरे आणि माधुरी गावित यांचे मार्गदर्शन लाभले.

संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चॅलेंज गेम, जिल्हा सायकल असोसिएशनचे चरणजितसिंह संघा यांच्या मार्गदर्शनाखाली सायकलिंग, अमित मगर यांच्या मार्गदर्शनाखाली मार्शल आर्टस्‌, जिल्हा तलवारबाजी संघटनेचे दिनेश वंजारे यांच्या मार्गदर्शनाखाली तलवारबाजी, मच्छिंद्र राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली गदायुद्ध, शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जंप रोप, लता कालवार यांच्या मार्गदर्शनाखाली ताइक्वांदो, हिमांशू महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली सेल्फ डिफेन्सचे सादरीकरण करण्यात आले. जिल्हा जलतरण संघटनेचे अभय देशमुख यांच्यासह क्रीडा संघटनांच्या प्रतिनिधींनी कार्यक्रमात सहभाग नोंदविला. औरंगाबादच्या ज्युनिअर चॅर्ली चॅप्लीन सोमनाथने आपल्या कलाकृतीद्वारे उपस्थितांचे लक्ष वेधले. २३ ते २५ डिसेंबरला कॅनॉट प्लेस परिसरात होणाऱ्या नियोजित ‘ओपन स्ट्रीटस्‌’मध्ये सहभाग नोंदविण्याचे नागरिकांना आवाहन केले.