शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

पंढरपुरातील नागरिकांची उच्च न्यायालयात धाव

By admin | Updated: August 17, 2016 00:52 IST

औरंगाबाद : पंढरपुरातील कथित अतिक्रमणांच्या नावाखाली शासन स्तरावरून सुरू करण्यात आलेल्या कार्यवाहीच्या अनुषंगाने १८३ नागरिकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात हस्तक्षेप अर्ज दाखल केले.

औरंगाबाद : पंढरपुरातील कथित अतिक्रमणांच्या नावाखाली शासन स्तरावरून सुरू करण्यात आलेल्या कार्यवाहीच्या अनुषंगाने १८३ नागरिकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात हस्तक्षेप अर्ज दाखल केले. त्यांनी अतिक्रमणाबाबत ‘जैसे थे’ परिस्थिती ठेवण्याबाबतच्या शासनाच्या आदेशाची प्रत खंडपीठात सादर केली. न्या. एस.व्ही. गंगापूरवाला आणि न्या. के.एल. वडणे यांच्या खंडपीठाने ते रेकॉर्डवर घेऊन यासंदर्भात शासनाकडील कार्यवाहीबाबत दोन आठवड्यांत माहिती सादर करण्याचा आदेश सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे यांना मंगळवारी दिला. लक्ष्मीनारायण छोटेलाल राठोड आणि शेख हुसेन पटेल यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका सादर करून पंढरपूर येथील शासकीय गायरान जमिनीवरील अतिक्रमण केलेल्या ग्रामपंचायत सदस्यांना अपात्र ठरवावे. तसेच येथील गट क्रमांक १२,१३ व १७५ वरील अतिक्रमणांबाबत कार्यवाही करण्याची विनंती केली आहे. सुनावणीदरम्यान हरिश्चंद्र्र आसाराम बनसोडे व इतर १८२ व्यक्तींनी खंडपीठात हस्तक्षेप अर्ज सादर केला. हस्तक्षेपकांमार्फत शासनाच्या ११ आॅगस्ट २०१६ च्या आदेशाची प्रत खंडपीठात सादर करण्यात आली. यामध्ये शासनाने पंढरपूर-वळदगाव येथील अतिक्रमणांबाबत पुढील आदेशापर्यंत ‘जैसे थे’ परिस्थिती ठेवण्याचे आदेश दिले आहेत. अतिक्रमणे नियमाकुल करण्याबाबत संबंधितांना निर्देश दिले आहेत. पंढरपूर वळदगाव येथे गट क्रमांक १२, १३ आणि १७५ वर सुमारे ३००० वर घरे बांधलेली असून या गटांमध्ये २० हजारांच्यावर लोकवस्ती आहे. संबंधितांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर खंडपीठाने सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे यांना या प्रकरणी माहिती घेण्याचे निर्देश देऊन दोन आठवड्यांसाठी सुनावणी तहकूब केली. या प्रकरणात याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. आनंदसिंह बायस, जिल्हा परिषदेतर्फे अ‍ॅड. अमोल जगतकर, ग्रामपंचायत सदस्यांतर्फे अ‍ॅड. सिद्धेश्वर एस. ठोंबरे आणि हस्तक्षेपकांतर्फे अ‍ॅड. देवदत्त पालोदकर काम पाहत आहेत.