शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
2
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
3
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
4
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
5
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
6
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
7
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
8
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
9
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
10
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
11
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
12
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
13
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
14
कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
15
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
16
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
17
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
18
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
19
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
20
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
Daily Top 2Weekly Top 5

नारायणगडाच्या महंतांची निवड घटनेनुसारच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 00:20 IST

शिरूर कासार तालुक्यातील श्रीक्षेत्र नारायण गडाचे महंत म्हणून ह.भ.प. शिवाजी महाराज यांची विश्वस्तांनी बहुमताने केलेली निवड ही घटनेनुसारच असल्याचा निकाल सहायक धर्मदाय आयुक्त लातुर यांनी दिला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : शिरूर कासार तालुक्यातील श्रीक्षेत्र नारायण गडाचे महंत म्हणून ह.भ.प. शिवाजी महाराज यांची विश्वस्तांनी बहुमताने केलेली निवड ही घटनेनुसारच असल्याचा निकाल सहायक धर्मदाय आयुक्त लातुर यांनी दिला आहे. याविरु द्धचे अपील त्यांनी फेटाळून लावले.श्री. क्षेत्र नारायण गड संस्थानाचे मठाधिपती महंत ह.भ.प. महादेव महाराज गुरूमाणिक महाराज हे १९ जुलै २०११ रोजी वैकुंठवासी झाले. त्यामुळे संस्थानाच्या विश्वस्थांनी तातडीची सभा बोलावून आपल्या घटनात्मक अधिकारानुसार २० जुलै रोजी वै. महादेव महाराज यांच्या जागी त्यांचे वारस ह.भ.प. शिवाजी महाराज यांची लाखो भक्तांच्या उपस्थितीत निवड केली. यावेळी संस्थानाचे विश्वस्त माजी आ. राजेंद्र जगताप, दिलीप गोरे, अ‍ॅड.महादेव तुपे, भीमराव मस्के, प्रा. जनार्धन शेळके, महादेव लाटे, भागवत परजणे यांची उपस्थिती होती. निवड झाल्यानंतर वै. ह.भ.प. महंत महादेव महाराज यांचा समाधी सोहळा व सर्व धार्मिक विधी हा वारस व महंत म्हणून ह.भ.प. शिवाजी महाराज यांच्या हस्ते भाविकांच्या साक्षीने पार पडला.दरम्यान, संस्थानाचे महंत म्हणून नोंदणीसाठी सहायक धर्मदाय आयुक्त बीड यांच्याकडे विश्वस्तांनी अर्ज दाखल केला होता. परंतु, त्या बदल अर्जाविरूद्ध भागवत बळीराम गायकवाड यांनी आक्षेप नोंदविला. आक्षेप अर्ज आल्यानंतर अर्जदार व त्यांचे साक्षीदाराचे तोंडी साक्षीपुरावे नोंदविण्यात आले. त्यावर निर्णय देत सहायक धर्मदाय आयुक्त बीड यांनी ह.भ.प. शिवाजी महाराज यांची विश्वस्तांनी बहुमताने केलेली निवड ही घटनेनुसारच असल्याचा निकाल दिला होता.त्यानंतर भागवत गायकवाड यांनी सदर निर्णयाच्या विरोधात सहायक धर्मदाय आयुक्त लातुर यांच्याकडे अपील केले. दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकल्यानंतर व सर्व कागदपत्र तपासल्यानंतर सहायक धर्मदाय आयुक्त हर्लेकर यांनी अपील फेटाळून लावत बीडच्या न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. सदरील प्रकरणात ह.भ.प. शिवाजी महाराज यांच्या वतीने अ‍ॅड. डी.एन. सुर्यवंशी व अ‍ॅड. पी.आर. आर्सुळ यांनी काम पाहिले.