शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

मुलाचा खून: आई,वडील, भावाला जन्मठेप

By admin | Updated: September 20, 2014 00:31 IST

मुलाचा खून: आई,वडील, भावाला जन्मठेप

औरंगाबाद : माहेरी निघून गेलेल्या पत्नीला नांदावयास आणून वेगळे राहण्याचा हट्ट धरणाऱ्या स्वत:च्या मुलाचा गळा आवळून खून केल्याप्रकरणी त्याचे आई-वडील आणि भावाला जिल्हा सत्र न्यायाधीश एस. एस. सावंत यांनी जन्मठेप आणि प्रत्येकी २ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंड न भरल्यास आरोपींना सहा महिने सक्तमजुरी भोगावी लागणार आहे. रक्ताच्या नात्याला काळिमा फासणारी ही खुनाची घटना २०११ मध्ये करमाडजवळील भांबर्डा येथे घडली होती.सर्जेराव किसन काळे (६०), फु लाबाई सर्जेराव काळे (५४) आणि मृताचा भाऊ लक्ष्मण सर्जेराव काळे (२२, सर्व रा. भांबर्डा, ता. औरंगाबाद) असे जन्मठेपेची शिक्षा झालेल्या आई-वडील आणि भावाचे नाव आहे. मोठा मुलगा ज्ञानेश्वर (२८) याची पत्नी घरगुती कारणावरून माहेरी राहत होती. तिला नांदायला आणून वेगळे राहण्याचा विचार ज्ञानेश्वरने अनेकदा आई, वडील आणि भावाला बोलून दाखविला. त्यासाठी त्याने घर आणि शेताची वाटणी करण्याची मागणी आई-वडिलांकडे केली (पान ७ वर)(पान १ वरून) होती. त्यावरून त्यांच्यात वाद सुरू होता. ३० जून २०११ रोजी रात्री सव्वानऊ वाजेच्या सुमारास सर्जेराव यांचा भाऊ भीमराव हे पत्नीसह घरात टी. व्ही. पाहत बसलेले असताना सर्जेरावच्या घरातून वाचवा, वाचवा असा आवाज ऐकू येत असल्याने ते आणि त्यांची पत्नी तिकडे धावले. त्यावेळी सर्जेरावच्या घरासमोर आणि मागील बाजूला गावातील लोक जमा झालेले दिसले. दरवाजा ठोठावून तो उघडण्याचा प्रयत्न केला असता दरवाजा आतून बंद असल्याचे त्यांना दिसले. त्यानंतर काही वेळानंतर तिन्ही आरोपी घरातून बाहेर आले आणि घराला कुलूप लावून निघून जाऊ लागले. त्यांच्यासोबत ज्ञानेश्वर नसल्याने त्यांना संशय आल्याने उपस्थितांनी त्यांना थांबवून ठेवले. सरपंच बळीराम काळे यांनी करमाड पोलीस ठाण्याशी संपर्क साधून सर्जेराव यांच्या घरात काही तरी अघटित घडले असल्याचे कळविले. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सर्जेरावला दरवाजाचे कुलूप उघडायला लावले. त्यावेळी ज्ञानेश्वर हा पलंगावर मृतावस्थेत पडलेला होता. त्याच्या गळ्याभोवती आवळल्याच्या खुणा आणि कानातून रक्तस्राव झाल्याचे दिसत होते. मृतदेहाचे शवविच्छेदन केले असता त्याचा गळा आवळून खून झाल्याचे निष्पन्न झाले. आई-वडील आणि भावानेच ज्ञानेश्वरचा गळा आवळून खून केल्याची तक्रार भीमराव यांनी करमाड ठाण्यात नोंदविली.सहायक पोलीस निरीक्षक एस. एम. बुधवंत यांनी या केसचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याची सुनावणी झाली असता सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी लोकअभियोक्ता सुदेश शिरसाट यांनी ८ साक्षीदार तपासले. या खटल्यात मृताचा चुलता, सरपंच बळीराम काळे आणि इतर प्रत्यक्षदर्शी गावकरी आणि शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांची साक्ष महत्त्वाची ठरली.रक्ताच्या नात्याला काळिमा -आरोपींचे कृत्यया खटल्यात सरकार पक्षातर्फे न्यायालयात बाजू मांडणारे सहायक सरकारी लोकअभियोक्ता सुदेश शिरसाट म्हणाले की, केवळ पत्नीला नांदायला आणून आई-वडिलांपासून स्वतंत्र संसार करण्याची मृत ज्ञानेश्वरची इच्छा होती. त्याची मागणी धुडकावून आरोपींनी त्याचा खून केला. स्वत:च्या तरुण मुलास संपविण्याचे आरोपींचे कृत्य हे रक्ताच्या नात्याला काळिमा फासणारे आहे. त्यामुळे एकाच वेळी या तिघा आरोपींना न्यायालयाने ठोठावलेली जन्मठेप ही योग्य आहे.